Independence Day Speech 2023 News Sakal
लाइफस्टाइल

Independence Day Speech Tips 2023 : स्वातंत्र्यदिनी भाषण करायचे आहे? मग या गोष्टी ठेवा लक्षात

Independence Day Speech in Marathi 2023 (स्वातंत्र्यदिनाचे मराठी भाषण 2023) : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात तुम्हालाही भाषण करण्याची इच्छा आहे का? मग जाणून घ्या या महत्त्वापूर्ण टिप्स

सकाळ डिजिटल टीम

Independence Day 2023 : 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली होती. हा दिवस प्रत्येक भारतवासीयाकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या देशाचा प्रत्येक नागरिक दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी देशाचा 'स्वातंत्र्यदिन' जल्लोषात साजरा करतो. 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं याकरिता त्या काळात स्वतःचा जीव पणाला लावलेल्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. 15 ऑगस्टनिमित्ताने सोसायटी, शाळा, कॉलेजांमध्ये वादविवाद स्पर्धा, भाषण स्पर्धेचंही आयोजन केलं जाते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हालाही स्वतःचे विचार व्यक्त करायचे असतील तर आतापासूनच भाषण करण्याच्या तयारीस सुरुवात करा. भाषण उत्तम व्हावे, यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे, ते जाणून घेऊया...

स्वातंत्र्यदिनाचे भाषण कसे असावे?

  • स्वातंत्र्यदिनाचे भाषण छोटे व मुद्याला धरून असावे. प्रेक्षकांना समजण्यास सोपे असावे तसेच भाषणात प्रभावी वाक्यांचा वापर करावा. 

  • स्वतःचे विचार मांडण्यासोबतच आपण थोरांचेही विचार पुन्हा एकदा भाषणाच्या माध्यमांतून प्रेक्षकांसमोर मांडू शकता. 

  • प्रेक्षकांसोबत जोडले जाण्यासाठी भाषणाचा उत्तम सराव करावा. केवळ पाठ केलेला विषय आपण त्यांच्यासमोर बोलून दाखवत आहात, असे वाटू नये.  

  • महत्त्वाचे म्हणजे भाषणात नमूद केलेली ऐतिहासिक माहिती अचूक असावी.

  • आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव करावा, म्हणजे आपले हावभाव कसे होत आहेत, याबद्दलही तुम्हाला कल्पना येईल.    

  • लिहिलेले भाषण एकदा जाणकारांकडून तपासूनही घ्यावे. 

  • भाषण करताना वेशभूषाही या दिवसाला साजेशी अशी करावी.

मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवून भाषण केल्यास प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट नक्की होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT