भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये महात्मा गांधींचा सहभाग किती महत्त्वाचा होता हे तर सर्वांनाच माहिती आहे. ब्रिटिशांच्या जुलूमशाहीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढा देण्याची प्रेरणा बापूजींनी देशातील नागरिकांना दिली. या लढ्यामध्ये त्यांना कित्येक जणांची मोलाची साथ मिळाली. मात्र, यात एक नाव असं होतं ज्यांना लोकांनी 'गांधी बूढी' असं नाव दिलं.
ब्रिटिशकालीन बंगाल प्रांतामध्ये जन्मलेल्या मातंगिनी हाजरा यांची ही गोष्ट आहे. मातंगिनी यांचा बालविवाह झाला होता. अगदी तरुण वयातच त्या विधवा झाल्या होत्या. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांनी देशसेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलं. (Old Lady Gandhi)
मातंगिनी यांच्यावर बापूजींच्या शिकवणींचा भरपूर प्रभाव होता. त्यांनी गांधीजींप्रमाणे सूत कातण्यास सुरुवात केली होती. त्या खादीचे कपडे वापरत आणि लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहत. गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्या हिरिरीने सहभाग घेत. यामुळेच त्यांना कित्येक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला होता. गांधीजींप्रमाणेच राहणाऱ्या मातंगिनी यांना लोक 'ओल्ड लेडी गांधी' किंवा बूढी गांधी म्हणून ओळखत. (Matangini Hazra)
1942 साली जेव्हा गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली, तेव्हा त्यात मातंगिनी यांचं मोठं योगदान राहिलं. त्यांनी या आंदोलनात तब्बल 6,000 नागरिकांचं नेतृत्त्व केलं. एवढा मोठा जनसागर घेऊन त्या तामलुक पोलीस स्टेशन ताब्यात घेण्यासाठी निघाल्या असताना ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
समोरुन ब्रिटिश पोलीस गोळ्या झाडत असतानाही मातंगिनी हातात तिरंगा घेऊन पुढे चालत राहिल्या. सुरुवातीला एक गोळी त्यांच्या हाताला लागली, मात्र त्यानंतरही त्या थांबत नसल्याचं पाहून ब्रिटिशांनी आणखी गोळ्या झाडल्या. यातच एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली, आणि तीच त्यांच्या शहीद होण्याचं कारण ठरली.
मातंगिनी यांनी प्राण सोडतानाही हातातून तिरंगा सुटू दिला नाही. मृत्यूला सामोरं जातानाही, त्यांचे अखेरचे शब्द 'वंदे मातरम्' हे होते. गांधीजींची एक सच्ची अनुयायी आणि सोबती असलेल्या; तसंच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मातंगिनी हाजरा यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त विनम्र आदरांजली!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.