Indoor Plant Side Effects: Sakal
लाइफस्टाइल

Indoor Plant Side Effects: घरात झाडे लावण्याची आवड पडू शकते महागात, होऊ शकतात 'हे' आजार

तुम्ही घरात झाडे लावत असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा आजार वाढू शकतात.

पुजा बोनकिले

Indoor Plant Side Effects: अनेक लोकांना घरात झाडे लावायला आवडतात. घरातील काही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढवतात, तर ते डेंग्यू तापापासून अॅलर्जी आणि दमा या सर्व गोष्टींचा धोका देखील वाढवू शकतात.

डेंग्यूसारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार घरातील काही झाडांमुळे होतो. आरोग्य विभागाच्या मते घरातील काही झाडांमुळे श्वसनासंबंधित आणि डेंग्यू सारखे संसर्गजन्य आजार उन्हाळ्यात त्रास देऊ शकतात.

घरातील झाडांवर डासांची उत्पत्ती होते आणि पाणी, आर्द्रता आणि धूळ साचून राहिल्याने इतर अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. झाडांना पाणी देण्याबरोबरच बाटलींमधील पाणी वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे. तसेच घरातील झाडांच्या भोवती पाणी साचू देऊ नका. कोरोनानंतरच लोकांना घरामध्ये झाडे लावण्याची आवड अधिक निर्माण झाली आहे. पण पानांवरील धुळीचा थर वाऱ्याबरोबर घरात उडतो, यामुळे ॲलर्जी आणि श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

घरामध्ये पाण्यात जगणारे झाडे म्हणजेच मनी किंवा बांबू प्लॅट असतील तर बाटलीतील पाणी रोज बदलावे. पॉटिंग ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नका. त्याचप्रमाणे फ्रिजच्या ट्रेमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. यामुळे वेळोवेळी फ्रिजचा ट्रे स्वच्छ करावा.

घरांमध्ये डास होऊ नये म्हणून काय करावे?

वेळी किंवा झाड लावलेल्या बाटल्यांचे तोंड बंद ठेवावे.

दररोज झाडांमधील पाणी बदलावे.

झाडाची भांडी ठेवणाऱ्या ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नका.

याशिवाय फ्रिजच्या खाली असलेल्या ट्रेमध्ये पाणी साचल्यास काढून टाकावे.

घराबाहेर नाली असेल तर ती झाकून ठेवावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

RBI Repo Rate: महागाई झाली कमी! आता तुमचा EMI कमी होणार का? RBI लवकरच घेणार मोठा निर्णय

Crime News: कसारा रेल्वेस्थानकात टीसीकडून ७ वर्षांच्या चिमकुलीचा आईसमोरच विनयभंग; महिलेने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले अन्...

Panchang 15 July 2025: आजच्या दिवशी ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

Solapur News : गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा खा. मोहिते पाटलांकडून निषेध

SCROLL FOR NEXT