Interesting Facts
Interesting Facts esakal
लाइफस्टाइल

Interesting Facts :  माकडांनी केलं होतं पहिलं Kiss? जाणून घ्या रंजक इतिहास

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. राजस्थानमध्ये रॅलीदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांच्या दिशेने फ्लाइंग किस दिले. ही बाब खूप चर्चेत आली होती. त्यावरून सोशल मिडियावर अनेक पोस्टही व्हायरल झाली आहे.  

पहिला किस कुठे आणि कोणी घेतला असेल हे प्रश्न कधीतरी तूम्हालाही पडले असतील. आज चुंबनाबद्दल रंजक गोष्टी जाणून घेऊयात. रोमान्सची सुरूवात करण्यासाठी चुंबन गरजेचे असल्याचे मानले जाते. पण, काही देशात चुंबन घेणे चुकीच्या अर्थाने घेतले जाते.

ओठांवरील चुंबन हे प्रेमाचे प्रतीक बनले. चुंबनातही फ्रेंच किस प्रसिद्ध आहे. त्यामूळे किसिंगची सुरूवात त्यांच्यापासूनच झाली की काय? असे वाटणे साहजिक आहे. पण,तसे नाही. काही संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, चुंबन भारतातून सुरू झाले आणि विदेशी आक्रमनांनंतर ते जगभर पसरले, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कधी एखाद्या स्टेजवर अभिनेत्रीचे चुंबन घेण्यात आल्याने तर कधी ऑन स्क्रीन केलेल्या किसिंग सीनमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहे. याच किसची सुरूवात कधीपासून झाली याबद्दल मानववंशशास्त्रज्ञ वेगवेगळे सिद्धांत देतात. कदाचित जगातील पहिले चुंबन अपघातानेच झाले असावे, असा अंदाज वर्तविला जातो.

पण, सत्य असे आहे की, किसिंगची सुरूवात ही प्रेमाच्या नव्हे तर मायेच्या भावनेने झाली आहे. त्याच झालं असं की, आपल्या पुर्वजांनी म्हणजे माकडांनी याची सुरूवात केली. जेव्हा एक आई लहान माकडाला खायला घालायची. तेव्हा बाळाला खाऊ भरवण्याची पद्धतही वेगळी होती. त्यावेळी आई आधि स्वत: अन्न तोंडात घ्यायची आणि चावून अगदी बारीक करून ते अन्न तोंडानेच बाळाच्या तोंडात द्यायची.

याला ‘प्रीमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर’ असेही म्हणतात. आजही अनेक प्राणी बालकाला अशाच पद्धतीने खायला भरवतात. त्यातूनच किस करण्याची सुरूनात अश्मयुगीन काळात झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.केवळ खाद्य भरवतानाच नव्हे तर इतरवेळीही चिंपांझी माता आपल्या मुलांचे चुंबन घेतात. त्यामुळे चुंबन घेण्याचा व्यवहार आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो असण्याची शक्यता आहे.

आणखी एक सिद्धांत देखील आहे, ज्यानुसार चुंबनाची सुरूवात अपघातामुळे झाली असल्याचे होते. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानव वंशशास्त्र विभागाने यावर मोठा अभ्यास केला आणि असा दावा केला की, पुर्वीच्या काळात भेटल्यानंतर एकमेकांच्या शरिराचा वास घेतला जायचा. ते लोक तसे का करायचे याला काही शास्त्रिय कारण नाही. मात्र, असे एकमेकांचा वास घेत असतानाच अपघाताने ओठांना ओठांचा स्पर्श झाला असेल आणि मनुष्य जातीत चुंबनन घेण्याती प्रथा सुरू झाली असावी असा दावा करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT