International Coffee Day esakal
लाइफस्टाइल

International Coffee Day : या वेळेत कॉफी प्यायल्यास होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध..

सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे अनेक रोगांना बळी पडण्यास कारणीभूत ठरू शकते.

साक्षी राऊत

International Coffee Day : कॉफीचा फ्लेवर आणि त्याचा स्मेल लोकांना फार आवडतो. अनेक रिसर्चमधून अशी माहिती पुढे आली आहे की कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कॉफी हृदयरोगासह, मधुमेह, अल्झायमर आणि कँसरपर्यंतच्या आजारापासून बचावास मदत करते. मात्र कॉफीचे हे फायदे वाचून तुम्ही सकाळ संध्याकाळ कॉफी पित असाल तर ही आयडिया तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिणे अनेक रोगांना बळी पडण्यास कारणीभूत ठरू शकते.

मूड स्विंगच्या समस्येने व्हाल त्रस्त

सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यामुळे तुमची स्ट्रेस लेव्हल वाढू शकते. कॉफी प्यायल्याने कार्टिसोल हार्मोन्सचे प्रोडक्शन वाढते. जे स्ट्रेस वाढण्यास कारणीभूत ठरतात. ज्यामुळे तुम्ही सकाळी स्ट्रेस अनुभवता.

हार्मोनल इम्बॅलेंस

कार्टिसोल हार्मोन्स फक्त स्ट्रेसच वाढवत नाही तर त्यामुळे इतर आजारांनाही निमंत्रण देते. हार्मोनल इम्बॅलेंस महिलांमध्ये ओव्हेल्यूशनची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरते. शिवाय वजन वाढण्यासुद्धा कारणीभूत ठरते.

अॅसिडीटीची समस्या

सकाळची सुरुवात कॉफीने केल्यास त्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रोडक्शन वाढते. ज्यामुळे अपचन, ब्लॉटिंग, मळमळणे यांसारख्या समस्या वाढतात.

ब्लड शुगर वाढवण्यासा कारणीभूत

सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढते. ज्यामुळे सकाळी उठताबरोबत तुमची ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होते.

शरीरात सूजन

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. ज्यामुळे शरीरातील विविध अंगांवर सूज येते. ज्यामुळे मधुमेह, थकवा, स्किन प्रॉब्लेम आणि ऑटो इम्यून यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. (International Coffee Day)

संध्याकाळच्या कॉफीने झोप उडेल

संध्याकाळी तुम्ही कॉफी प्यायल्यास त्यातील कॅफिनचे प्रमाण मेंदूला उत्तेजित करते. ज्यामुळे तुमची झोप उडते.

कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

कॉफी पिण्यापासून होणाऱ्या तोट्यांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर ब्रेकफास्टनंतर कॉफी पिणे योग्य ठरेल. आणि तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदेही होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT