International Day of Happiness 2024  esakal
लाइफस्टाइल

International Day of Happiness 2024 : निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी 'या' योगासनांचा दररोज करा सराव, ताण-तणावापासून मिळेल आराम

International Day of Happiness 2024 : जगभरात २० मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय आनंद दिन' म्हणून साजरा केला जातो. आनंदी राहण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

International Day of Happiness 2024 : रोजचे धावपळीचे जीवन, ऑफिसला जाण्याची गडबड, कामाचा ताण-तणाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शिवाय, यासोबतच चिडचिडेपणा आणि मन उदास होणे, इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व गोष्टींमुळे आयुष्यातून आनंद हरवून जातो. मग, अशा परिस्थितीमध्ये मन सतत उदास राहते, चिंता आणि ताण-तणाव वाढतो. काही जण तर हसणे देखील विसरून जातात.

आनंद हा प्रत्येकाच्या आयुष्यात असणे, फार महत्वाचे आहे, जर हा आनंद नसेल तर मग माणसाचे आयुष्य व्यर्थ आहे. जगभरात २० मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय आनंद दिन' म्हणून साजरा केला जातो.

या आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाच्या निमित्ताने आज आपण आनंदी राहण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत. या योगासनांचा नियमितपणे सराव केल्यामुळे मन शांत, चिंतामुक्त आणि आनंदी राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात मन आनंदी ठेवणाऱ्या या योगासनांबद्दल. (International Day of Happiness 2024)

बालासन

बालासन या योगासनाला चाईल्ड पोझ म्हणून ही ओळखले जाते. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय, आपले शरीर लवचिक बनते. बालासनाचा सराव केल्याने ताण-तणाव, चिंता, निद्रानाश इत्यादी समस्या दूर होतात. मानसिक शांतीसाठी आणि आनंदी राहण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर वज्रासनाच्या स्थितीमध्ये सरळ बसा. त्यानंतर, दीर्घ श्वास घेताना तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करा. आता श्वास सोडा आणि खाली वाका. आता तुमच्या दोन्ही हातांचे तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या हातांची बोटे एकमेकांना जोडून दोन्ही तळहातांच्या मधोमध तुमचे डोके ठेवा. आता तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Balasana)

वज्रासन

वज्रासन हे योगासन मानसिक शांतीसाठी आणि मूड सुधारण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. वज्रासनाचा नियमित सराव केल्याने पोटाच्या समस्या आणि आळस दूर होण्यास मदत होते.

हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ बसा. आता तुमचे दोन्ही गुडघे वाकवून ताठ बसा. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात बाजूला ठेवा आणि दोन्ही पायांच्या टाचांवर तुमचे नितंब ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि सरळ रेषेत पाहा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरिरात ताण जाणवेल. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या. (Vajrasana)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT