World Women Day Special Article| Why we celebrate Women's Day sakal
लाइफस्टाइल

महिला दिन का साजरा केला जातो ? यावर्षीची थीम जाणून घ्या!

आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत

सकाळ डिजिटल टीम

महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे. या दिवसाची सुरूवात कशी झाली? यंदाची थीम काय त्याची माहिती असणे गरजेचे आहे.

यंदाची थीम अशी (Theme for Women's day)

‘जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ ही आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ ची थीम आहे. याचा अर्थ मजबूत भविष्यासाठी लैंगिक समानता गरजेची आहे. तर या निमित्ताने जांभळा, हिरवा आणि पांढरा असे रंग देण्यात आले आहेत. जांभळा रंग न्याय आणि सन्मानाचे प्रतीक आहे. हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे आणि पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे.

हा दिवस साजरा करण्याचे कारण (Why we celebrate Women's Day)

महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठीही साजरा केला जातो.

महिला दिनाची सुरूवात कधी झाली? - अमेरिकेमध्ये १९०८ साली कामगार चळवळ झाली. त्यावेळी १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांनी कामाचे तास कमी करावेत, मतदानाचा अधिकार द्यावा, वेतनश्रेणी वाढवावी अश्या अनेक मागण्या केल्या. त्याची त्याची दखल त्यावेळच्या सरकारने घेतली. १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. तो मोर्चा ८ मार्च रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर महिला दिनाची सुरूवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli Accident: शोकसंतप्त नागरिकांचे महामार्गावर आंदोलन; चौघांचा मृत्यू, दोन गंभीर, भरधाव ट्रकची सहा युवकांना जबर धडक

Kolhapur Health Crisis : रात्री डॉक्टर नव्हते, रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही; बाळ असलेल्या आईच्या पोटात रक्तस्त्राव झाला अन्

Latest Marathi News Updates: शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी शिक्षण विभागाकडून केली जाणार- नागो गाणार

Nanded Farmers: नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बाजारभावाचा फटका; नांदेडमध्ये सात महिन्यांत ८९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Bank Bharti 2025: युनियन बँकेत मोठी पदभरती; पगार ९० हजार, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT