Relationship: सामान्यत: पुरुषाने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करावे, असं म्हटलं जातं पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीसोबत लग्न करणे किंवा प्रेमसंबंध ठेवणे चुकीचं आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. (is it wrong having love relation or marriage with a girl elder or older than you read story)
पुरुषाने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करावे यामागे वैज्ञानिक कारण आहे. असं म्हणतात की स्त्रीचे जीवनचक्र पुरुषाच्या तुलनेत किमान २-३ वर्ष फास्ट असते. म्हणजेच मुलींना मुलांपेक्षा लवकर समज येतो.
मुलांच्या तुलनेत मुली लवकर बोलणे-चालणे शिकतात आणि लवकर वयात येतात. सोबतच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना म्हातारपणाही लवकर येतं. त्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न करणे पुरुषांना योग्य ठरतं.
वैदिक शास्त्रानुसार आपल्या पेक्षा मोठी स्त्री ही माता असते. म्हणून असा विवाह चुकीचा असतो. या दोघांपासून मुलं मुली वर्णसंकरीत गृहीत धरली जातात. अश्या विवाह जोडप्याची दैव कर्म आणि मनुष्य कर्मे सफल होत नाहीत, असं ही वैदिक शास्त्रात लिहलंय. वैदिक शास्त्रात लिहल्याप्रमाणे अश्या पुरुषाचे आयुष्यही कमी होते. स्त्री दोष निर्माण होतो.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवणं चुकीचं आहे का?
आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवणं, हा प्रत्येकाचा वैयक्तिक चॉईस आहे. व्यक्तिचा स्वभाव, एकमेकांवरील प्रेम विश्वास या सर्व गोष्टी कोणत्याही नात्याची प्राथमिकता असते आणि प्रेमात वय ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे की बरोबर हे आपण ठरवू शकत नाही.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.