Wedding Special  esakal
लाइफस्टाइल

Wedding Special : १७ कोटींची साडी आणि ३० लाखांचा मेकअप; ‘ही’ आहे देशातील सर्वात महागड्या लग्नाची गोष्ट

हे लग्न आजही देशातील सर्वात महागडे लग्न म्हणून ओळखले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Wedding Special : यंदा लग्नाचे मुहूर्त हे भरगच्च आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विवाहाच्या तिथी अधिक आहेत. तब्बल ६१ विवाहाच्या तिथी आहेत. तुळशीचे लग्न धूमधडाक्यात पार पडल्यानंतर आता या लग्नाच्या मुहूर्तांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे, सध्य देशभरात वेडिंग सिझनचा उत्साह पहायला मिळत आहे.

हा वेडिंगचा माहोल सुरू झालेला असतानाच नुकताच कॅटने (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) दावा केला आहे की, देशात डिसेंबरपर्यंत तब्बल ४० लाख लग्न पार पडणार आहेत. त्यापैकी, हजारो लग्नांवर कोट्यावधी रूपयांपेक्षा जास्तीचा खर्च येणार आहे.

लग्नात करोडोंचा खर्च करणारे अनेक जण असतात. हे लोक नेहमीच चर्चेत येतात. अशा महागड्या लग्नांबद्दल लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता पहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला देशातील एका अशा लग्नाबद्दल सांगणार आहोत. जे लग्न आजही देशातील सर्वात महागडे लग्न म्हणून ओळखले जाते.

५०० कोटींचे शाही लग्न

कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नात तब्बल ५०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी हिचा विवाह ६ नोव्हेंबर २०१६ मध्ये पार पडला होता. या लग्नाला आता ७ वर्षे झाली आहेत.

मात्र, आज ही हे लग्न चर्चेच विषय आहे. कारण, ५ दिवस चाललेल्या या लग्नात तब्बल ५०० कोटींचा खर्च करण्यात आला होता. हा विवाह केवळ कर्नाटक राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झाला होता.

१७ कोटींची साडी आणि ९० कोटींचे दागिने

या लग्नाची खासियत म्हणजे वधू ब्राह्मणी हिने लग्नात तब्बल १७ कोटी रूपयांची महागडी साडी नेसली होती. ही साडी कांजीवरम होती. विशेष म्हणजे सोन्याची तार असलेली ही भरजरी साडी ब्राह्मणीने लग्नात नेसली होती.

साडीसोबतच तिने परिधान केलेल्या दागिन्यांची किंमत ही ९० कोटी रूपये होती. त्यामुळे, तिच्या दागिन्यांची देखील चर्चा झाली होती. असे म्हटले जाते की, असा विवाह देशात यापूर्वी कधीच झाला नाही.

३० लाखांचा मेकअप

वधूने लग्नात १७ कोटींची साडी आणि ९० कोटींचे दागिने परिधान केल्यानंतर तिच्या मेकअपची देखील तितकीच चर्चा झाली. कारण, तिच्या लग्नात करण्यात आलेला मेकअप हा तब्बल ३० लाख रूपयांचा होता.

या लग्नात ब्राह्मणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला खास मुंबईहून बोलावण्यात आले होते. तिची फी तबब्ल ६ लाख रूपये आकारण्यात आली होती. वधू व्यतिरिक्त तिच्या पाहुण्यांचा मेकअप करण्यासाठी बंगळूरच्या ५० हून अधिक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टना बोलावण्यात आले होते. ज्यावर ३० लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता.

पाहुण्यांसाठी २००० कॅब आणि १५ हेलिकॉप्टर

ब्राह्मणीच्या विवाहासाठी तब्बल ५० हजार पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली होती, असे सांगितले जाते. या लग्नात पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी २००० कॅब आणि १५ हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. या कॅब आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते.

जनार्दन रेड्डी यांनी खास पाहुण्यांसाठी बंगळुरूतील सर्व पंचतारांकित हॉटेल्समध्ये सुमारे १५०० खोल्यांचे बुकिंग केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: चक्क RAW संचालक बनून लग्न! महिला न्यायाधीशाला फसवंल... पण सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वच थक्क!

World Toilet Day 2025: 'टॉयलेट डे'ची सुरुवात कोणी आणि का केली? कारण जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल!

'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर

Indira Gandhi:'गरिबांच्या अम्मा घ्यायच्या दिवसात १२ ते १५ सभा'; इंदिरा गांधी यांचा झंजावात, जुन्या जाणत्यांना १९८० ची लख्ख आठवण..

बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

SCROLL FOR NEXT