Janmasthami 2024 esakal
लाइफस्टाइल

Janmasthami 2024 : कान्हा,कन्हैय्या नाहीतर बाळासाठी निवडा श्री कृष्णांची ही ट्रेंडी नावे, बाळाचंं नशिब उजळवतील ही नावं

Lord Krishna Trendy Names : बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. तेव्हा त्याचे नाव आणि कतृत्व श्री कृष्णांसारखे असावे, अशी इच्छा असते                                              

सकाळ डिजिटल टीम

Lord Krishna Trendy Names :

लहान मुलांसाठी योग्य नाव शोधणं तसं कठीण काम आहे. लहान मुलांच्या जन्माआधीच काही पालकांनी नावं ठरवलेली असतात. तर नामकरण सोहळा उजाडला तरी काही लोकांची नावे ठरलेली नसतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला पहायला येणारी प्रत्येक व्यक्ती कान्हा, कृष्णा, कन्हैय्या अशा नावांनी त्याला बोलवत असते.

पण, बाळाचे नाव काय ठेवावे असा प्रश्न प्रत्येक पालकाला पडतो. तेव्हा त्याचे नाव आणि कतृत्व श्री कृष्णांसारखे असावे, अशी इच्छा असते. त्यामुळेच, अलिकडील काळात मुलांची वेगवेगळी नावे पहायला मिळतात. पण, अनेकवेळा त्या नावांचा अर्थ पालकांनाही नीटसा सांगता येत नाही. (Lord krishna names)

तुम्हालाही जर श्री कृष्णांवरून बाळाचे नाव ठेवायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, जन्माष्टमी लवकरच साजरी होणार आहे. त्यादिवशी जन्म झालेल्या मुलांची नावे श्री कृष्णावरून ठेवली जातात. तुम्हीही अशा नावांच्या शोधात असाल तर नावे अन् त्यांचे अर्थ समजून घ्या.

अच्‍युत – कधीच चुकत नाही असा

अनंतजीत – नेहमी विजय प्राप्त करणारा

अनिरुद्धा – ज्याचा कोणी विरोध करू शकत नाही

आरिव – बुद्धी आणि न्यायाचा राजा

गोपेश - गोपाळांचा स्वामी

ईशान - भगवान श्री कृष्णांचे एक नाव

मदन – प्रेमाचं प्रतिक (Trendy names for baby boys)

मुकुंद –स्वतंत्र्य करणारा

मधुसूदन – दानवांचा कर्दनकाळ असलेला

मयूर – मुकूटावर मोरपंख असलेला

कियान – अतिप्राचीन असणारा किंवा एक राजा

ओनिश – मनाचा स्वामी

पिनाकी- धनुष्याचा क्षेत्रक असलेला

पद्मनाभ – कमळाच्या आकाराची नाभी असलेला

सात्यकी – श्री कृष्णाचा सारथी

केयांश - सर्वगुणसंपन्न असणारा व्यक्ती, भगवान कृष्ण

क्रिशिन -  कृष्णाचे एक नाव

क्रितिश -  कलेचे नाव, कृष्णाचे एक नाव

क्रिशिव -  भगवान कृष्ण, कृष्ण आणि शिवाचा अंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT