water sakal
लाइफस्टाइल

Water Therapy: वॉटर थेरपीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पाणी हे जपानी लोकांच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य आहे.

Aishwarya Musale

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे, आपल्याला डिहायड्रेशनसह अनेक रोगांचा धोका असतो. शारीरिक आरोग्यासोबतच पाण्याचा आपल्या त्वचेवर आणि केसांवरही चांगला परिणाम होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने दिवसातून सुमारे 8 ग्लास पाणी प्यावे.

काही संशोधनानुसार, रिकाम्या पोटी पाणी पिल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. जपानच्या लोकांना हे चांगलेच समजते. पाणी हे जपानी लोकांच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य आहे. जपानी लोक वॉटर थेरपीचा अवलंब करतात, ज्यामुळे ते तंदुरुस्त तसेच तरुण राहतात.

जपानी वॉटर थेरपी जाणून घ्या

या थेरपीचा साधा अर्थ म्हणजे सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता पाणी पिणे. शक्य असल्यास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज निघून जातात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सकाळी उठल्यानंतर सुमारे 4 ते 5 ग्लास पाणी प्यावे. तसेच शरीरातील चयापचय क्रिया सुधारते

या थेरपीची संपूर्ण प्रक्रिया काय आहे

जपानी वॉटर थेरपीनुसार, ब्रश केल्यानंतर ४५ मिनिटांनीच पाणी प्यावे. ब्रश केल्यानंतर, काहीही खाण्यापूर्वी पाणी प्या. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. वॉटर थेरपीमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे उभे राहून पाणी पिऊ नये. एका जागी आरामात बसून मगच पाणी पिणे चांगले.

तसेच, एका श्वासात वेगाने पाणी पिणे टाळा. त्याऐवजी, सिप करून पाणी प्या. काही लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. लक्षात ठेवा की जेवणाच्या मध्यभागी सुमारे 30 मिनिटे आधी पाणी प्या.

ते खरोखर फायदेशीर आहे का?

जपानी वॉटर थेरपीचा अवलंब केल्याने फास्ट वजन कमी होते. याशिवाय केसांची वाढही चांगली होते. यामुळे त्वचेलाही फायदा होतो. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, ही थेरपी बद्धकोष्ठतेपासून कर्करोगापर्यंतच्या आजारांमध्ये फायदेशीर आहे, परंतु याचा कोणताही पुरावा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT