Karva Chauth 2023 esakal
लाइफस्टाइल

Karva Chauth 2023: करवा चौथला कोणती साडी नेसायची? ‘या’ अभिनेत्रींच्या साडी लूक्सपासून घ्या प्रेरणा

करवा चौथला साडी लूक कसा करायचा? हा प्रश्न महिलांना नेहमीच पडतो.

Monika Lonkar –Kumbhar

Karva Chauth 2023 : करवा चौथ हा विवाहित महिलांसाठी अतिशय महत्वाचा असतो. यावर्षी करवा चौथ १ नोव्हेंबरला आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. करवा चौथसाठी पूजेपासून ते मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी लूकपर्यंत महिलांची जोरदार तयारी सुरू असते.

करवा चौथला मग कोणती साडी नेसायची? हा प्रश्न महिलांना नेहमीच पडतो. साड्यांमध्ये दरवर्षी अनेक ऑप्शन्स देखील येत असतात. जॉर्जेट, खादी, कॉटन, शिफॉन, डिझायनर,बनारसी, शिमरी इत्यादी अनेक प्रकार साड्यांमध्ये उपलब्ध आहेत.

टिश्यू सिल्क या प्रकारची साडी देखील खुलून दिसते. या करवाचौथला तुम्ही या प्रकारची साडी नक्कची नेसू शकता. त्यासाठी आज आपण काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या टिश्यू सिल्क साडी लूक्सपासून प्रेरणा घेणार आहोत. अभिनेत्रींच्या या लूक्सपासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमचा लूक आणखी खुलवू शकता.

जान्हवी कपूर

मागील काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ही लाईट पिंक कलरची टिश्यू सिल्क साडी नेसली होती. या साडीमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. या साडीवर तिने मॅचिंग आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी केली होती. यामुळे, तिचा लूक आणखी खुलून आला होता. तुम्ही देखील करवा चौथला जान्हवी प्रमाणे टिश्यू सिल्क साडी स्टाईल करू शकता.

मलायका अरोरा

मलायका प्रमाणे तुम्ही देखील गोल्डन रंगाची टिश्यू सिल्क साडी नेसू शकता. मलायकाने या साडीवर ओव्हरसाईज्ड कानातले घातले असून तिने मिनिमल मेकअप केला आहे.

त्यामुळे, या साडीमध्ये मलायका आणखी सुंदर दिसत आहे. करवा चौथला या प्रकारची टिश्यू सिल्क साडी नेसून तुम्ही तुमचा लूक मिनिमल  मात्र, तितकाच हटके करू शकता.

करिश्मा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी खास ओळखली जाते. तिचे साडी लूक्स नेहमीच प्रेरणादायी असतात. तिने मागील काही दिवसांपूर्वीच ही सिल्वर कॉपर टिश्यू साडी नेसली होती.

तिची ही साडी क्लासी आहे. या साडीवर करिश्माने शिमरी ब्लाऊज मॅचिंग केला आहे. तसेच, हेव्ही कानातले घालून तिने तिचा हा सुंदर लूक पूर्ण केला आहे. करिश्माच्या या लूकप्रमाणे तुम्ही देखील तुमचा टिश्यू सिल्स साडी लूक पूर्ण करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT