Impact of Indoor Play Zones on child Health sakal
लाइफस्टाइल

Children Changing Lifestyle: रिकामी मैदानं, फुल प्ले झोन्स; मुलांमधील चिडचिडेपणा वाढून रोगप्रतिकारशक्ती झाली कमी

Impact of Indoor Play Zones on child Health: मैदानी खेळांकडे पाठ फिरवणाऱ्या मुलांमध्ये चिडचिड वाढली असून रोगप्रतिकारशक्तीही कमी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Increasing Irritability in Children Due to Lack of Outdoor Play: खेळामुळे मुलांचा मानसिक व बौद्धिक विकास होतो. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात आजची पिढी मैदानी खेळांपासून दूर होत आहे. खेळाची जागा प्ले झोनने घेतली आहे. त्यातच मोबाइलवरील गेम्स, इलेक्ट्रॅानिक गॅजेट्स मैदानी खेळांवर भारी पडत आहे. या परिस्थितीला पालकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, मुलांना प्ले झोन व मोबाइलवरील गेम पाहिल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. त्याचवेळी त्यांची रोगप्रतिकार शक्तीही कमी होत आहे.

तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलत आहे. मुलांना नवीन गोष्टी शिकण्याचे, नवीन गोष्टी अवगत करण्याचे वेड मुलांना जन्मतः असते. आज सोशल मीडियावर प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन दिसते. मोबाइल एकच वस्तू जरी असली तरी त्यावर व्हिडिओ गेमसह जगातील अनेक नवनवीन गोष्टी उपलब्ध होतात. या गोष्टी शोधण्यासाठी सोशल मीडियावर मुलांना प्रोत्साहन दिले जाते. त्यातून मुले बाहेर पडण्यासाठी पालक मैदान नाही तर त्यांना प्ले झोनचा रस्ता दाखवतात. ही अतिशय चिंतेची बाब आहे. या परिस्थितीकडे लक्ष दिले नाही तर कालांतराने प्ले झोनचे व्यसन मुलांना लागणार. त्यामुळे, पालकांनी व शिक्षकांनी पुढील संभाव्य धोका समजून सावधगिरीची पाऊले उचलण्याची गरज आहे.

पालकांनी काय करावे

  • मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करावे.

  • सायकल चालवणे, मित्रांसोबत खेळणे, विविध एक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.

  • शाळांमध्ये खेळांचे आयोजन करावे व मुलांमध्ये मैदानी खेळ खेळण्याची आवड निर्माण करावी.

मुलांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहित करण्याचे फायदे

  • शारीरिक आरोग्य - मैदानी खेळ मुलांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक आहे.

  • मानसिक आरोग्य- मुलांचा ताण कमी होऊन एकाग्रता वाढते.

  • सामाजिक विकास- मुलांमध्ये टीमवर्क, नेतृत्व व संवादाचे कौशल्य निर्माण होते.

माझी मुलगी १० वर्षांची आहे. तिला प्ले झोनमध्ये जायला जास्त आवडते. परंतु, पालकांचे कर्तव्य म्हणून तिला मैदानी खेळ देखील माहिती असावे, यासाठी आम्ही तिला बास्केटबॅालचे क्लास लावून दिले आहे. ती दोन्ही ठिकाणी तितक्याच आवडीने खेळते.

- प्रणाली भुयार, गृहिणी

मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये शारीरिक बळकटी येते. हारणे आणि जिंकणे काय असत हे, खेळांतून त्यांना समजते. मुले मैदानावरच जीवन कौशल्ये मैदानावर जास्त शिकतात. शाळेमध्येसुद्धा स्पोर्ट्‌स हा विषय असतोच परंतु, मुले खरच खेळतात की गप्पा मारतात, याकडे शिक्षकांनी लक्ष द्यायला हवे. शारीरिक वाढीमुळे मुले संघ कार्य चांगल्याप्रकारे करू शकतात. हृदयाची गती, घाम गळणे हे ॲण्टीडिप्रेशनच काम करते. त्यामुळे, मुलांचा मानसिक विकास देखील चांगला होतो.

- डॅा. निखिल पांडे, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT