Kitchen Cleaning Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Cleaning Tips : फक्त एका सोप्या उपायाने करा काळी झालेली चहाची गाळणी स्वच्छ

चहाची गाळणी ही जवळपास प्रत्येक घरात अगदी रोजच्या रोज लागणारी वस्तू

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Cleaning Tips : चहाची गाळणी ही जवळपास प्रत्येक घरात अगदी रोजच्या रोज लागणारी वस्तू. चहाप्रेमींच्या घरी तर ३-४ वेळेसही लागू शकते. पण सततच्या वापरण्याने चहा गाळणी काळी पडू लागते.

बाकी कोणतीही भांडी घासून स्वच्छ होऊ शकतात पण काळी झालेली चहाची गाळणी स्वच्छ करणं खूप कठीण आहे; म्हणजे अगदी कधी कधी दुधाची जळकी पातीली निघू शकते पण चहाची गाळणी कशी स्वच्छ करावी हा प्रश्न नेहमीच असतो.

अशी काळी गाळणी पाहुण्यांसमोर काढायचं म्हटल तर आपल्यालाच कसं तरी होत. ती स्वच्छ करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय सांगतात; पण सगळेच उपाय यशस्वी होतात अस नाही आणि परिणामी ही गाळणी टाकून द्यावी लागते.

कमी मेहनतीत कळकट गाळणी स्वच्छ करा तेही अगदी नव्यासारखी

१. सगळ्यात आधी एका भांड्यात लिक्विड ब्लीच आणि पाणी सम प्रमाणात घ्या.

२. त्यात तुमचं खराब झालेलं गाळणं २ ते ३ तासांसाठी भिजत ठेवा.

३. आता तारेच्या घासणीने ते गाळणं घासून घ्या. गाळणं अगदी स्वच्छ, चकाचकित होईल.

टीप : ब्लीच आरोग्यासाठी हानिकारक असतं. त्यामुळे गाळणं त्यानंतरही काही तास पाण्यात भिजत ठेवा. २- ३ वेळा पाणी बदलून धुवून घ्या. उन्हात पुर्णपणे वाळवून घ्या आणि त्यानंतरच वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT