Kitchen Hack sakal
लाइफस्टाइल

Kitchen Hack : नॉन-स्टिक भांड्यांनाही चिकटतंय अन्न? मग धुताना 'या' 5 ट्रिक्स ट्राय करा

आज आम्ही तुम्हाला नॉन-स्टिक भांड्यांना कसं साफ करायचं याविषयी काही खास टिप्स सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Hack : स्वयंपाक करताना नेहमी अन्न भांड्याला चिकटतं त्यामुळे नॉर्मल कुकवेअरमध्ये जास्तीचं तेल टाकावं लागतं. सोबतच वारंवार फुडला भांड्याला चिकटू नये म्हणून चमच्याने फिरवावं लागतं. अशात नॉन स्टिक भांडे या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. ज्यामध्ये तेलही कमी टाकावं लागतं आणि अन्न सुद्धा चिकटत नाही. यात असलेल्या स्पेशल कोटींगमुळे हे होतं. (Kitchen Hack read how to wash non stick cookware read story )

या खास कोटींगमुळे या भांड्यांना धुताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर हे अन्न खराब होऊ शकतं आणि हे नॉन स्टिक भांडे सुद्धा नॉर्मल भांड्याच्या कॅटेगिरीमध्ये येतं

मुळात नॉन स्टिक भांडी खूप महाग असतात. त्यामुळे याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला नॉन-स्टिक भांड्यांना कसं साफ करायचं याविषयी काही खास टिप्स सांगणार आहोत.

अनेकदा नॉन-स्टिक भांड्यांनाही अन्न चिकटतंय मग हे भांडं धुताना 5 ट्रिक्स ट्राय कराव्यात. चला तर जाणून घेऊया.

  • नॉन स्टिक भांडी गरम असताना कधीही धुवू नये. धूण्यापूर्वी या भांड्याला थंड होऊ द्यावे. कारण गरम नॉन स्टिक कुकवेअर मध्ये पानी टाकल्याने कोटींग खराब होण्याची शक्यता अधिक असते.

  • नॉन स्टिक भांडी थंड झाल्यानंतर याला डिशवॉशनी कोमट पाण्यासह धुवावे. नॉन स्टिक भांड्यांना खूप वेळापर्यंत वर्किंग कंडीशनमध्ये ठेवण्यासाठी नेहमी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने धुवावे.

  • जेव्हा तुम्हाला तुमच्या भांड्यावर चमक हवी असते तेव्हा बेकिंग सोडा कामी येतो. नॉन स्टिक कुकींग दरम्यान जळले तर त्याला स्क्रबनी चुकूनही साफ करू नये. याऐवजी बेकींग सोडा आणि थोडं पाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवावी आणि मऊ स्पंज नी साफ करावे. असं केल्याने भांड्यावर चमक येणार.

  • नॉन स्टिक भांड्यांना साफ करताना कधीही स्टील स्क्रब किंवा कोणताही स्क्रब पॅडचा उपयोग करू नये. यामुळे कोटिंगचं नुकसान होतं ज्यामुळे नॉन स्टिक भांड्यानाही फुड चिकटतं

तुम्हाला नॉन स्टिक भांड्यांना सीजन करण्याची आवश्यकता नाही. फक्त किचन टॉवलवर कुकिंग ऑईलचा एक थेंब घ्या आणि साफ करताना पॅनला पुसा. हे भांड्याचं कोटींग दिर्घकाळ टिकवेल आणि तुमचं भांडं नव्यासारखं चमकणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT