Kitchen Hacks How to Remove Garlic Peel just Seconds  
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: लसूण सोलायचा कंटाळा आलाय? या जबरदस्त ट्रिक्स तुमच्या कामी येतील

रोजच्या घाईगडबडीत लसूण सोलणं खुप अवघड होत. तर काही महिलांना लसूण सोलायला कंटाळा येतो. पण तुम्हाला माहितीय का लसूण सोलण्याच्या काही सोप्या ट्रिक्स ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय स्वयंपाकघरात लसणाला अत्यंत महत्त्व आहे. लसणाशिवाय अनेक भाज्या, पदार्थ हे अपूर्ण आहेत. त्यामुळं स्वयंपाकघरामध्ये लसणाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण हा लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर त्याचा आरोग्यालाही तितकाच फायदा आहे. त्यामुळे लसणाचे अनेक पदार्थ बनवण्यात येतात.

चटणी, लोणचं असे विविध लसणाचे पदार्थ आहे. हे पदार्थ बनवण्याकरिता किमान पावशेर तर लसूण लागतो. पण हा इतका लसूण सोलून कोण देणार? असा सवाल प्रत्येक गृहिणींच्या मनात येतो.

रोजच्या घाईगडबडीत लसूण सोलणं खुप अवघड होत. तर काही महिलांना लसूण सोलायला कंटाळा येतो. पण तुम्हाला माहितीय का लसूण सोलण्याच्या काही सोप्या ट्रिक्स ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गरम पाणी वापरा

गरम पाणी वापरुन तुम्ही लसूण सोलू शकता. यासाठी लसणाच्या पाकळ्या काही मिनिटं गरम पाण्यात टाका. त्यानंतर जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. गरम पाण्यातून बाहेर काढल्यावर काही सेकंदात लसणाच्या पाकळ्या सोलून निघतील.

चाकूचा वापर करा

लसणाची सालं काढण्यासाठी तुम्ही चाकूचा वापर करू शकता. लसणीच्या सर्व पाकळ्या काढून घ्या. त्यानंतर चाकूच्या साहय्याने लसणाच्या पाकळ्यांच्या टोकाचा टणकदार भाग उडवा. त्यामुळं पटकन साल निघून येईल.

लाटण्याचा वापर

तुम्ही ज्याप्रमाणे पोळी लाटण्याने लाटता, त्याप्रमाणेच लसूण पोळपाटावर ठेवा आणि लाटणं त्यावर फिरवा. यामुळे लसणीच्या पाकळ्यांची सालं आपोआप निघतील.

कापडी पिशवी

लसूणाच्या पाकळ्यांना तेल लावा आणि त्या पाकळ्या एखाद्या कापडी पिशवीमध्ये ठेवा. त्यानंतर ही पिशवी हलक्या हातांनी जमीनिला चोळा ज्यामुळं लसणाच्या पाकळ्या पटकन निघतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT