Kitchen Hacks: esakal
लाइफस्टाइल

Kitchen Hacks: उन्हाळ्यात जेवण खराब का होत? तुम्हीही करताय पुर्वापार चालत आलेल्या या चूका?

उन्हाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले अन्न लवकर खराब होते

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Hacks :

रात्रीची भाजी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवायला विसरला असाल. तर ती भाजी सकाळी खराब झालेली असते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पदार्थ खराब होतात. पण यासाठी आपणच जबाबदार आहोत. कारण, पुर्वापार चालत आलेल्या पद्धती आपण बदलायला हव्यात.      

महिलांना स्वयंपाकघरात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्वयंपाकघरातील काही खाचांचा अवलंब करून या दैनंदिन समस्या कमी केल्या जाऊ शकतात. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले अन्न लवकर खराब होते. दीर्घकाळ अन्न फ्रेश ठेवणे कठीण असते. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्यास, आपण ते बराच काळ खराब होण्यापासून वाचवू शकतो.

जेवणात कमी मसाले वापरा

जेव्हा तुम्ही एखाद्या पदार्थात जास्त मसाला वापरता. तेव्हा, तो पदार्थ खराब होण्याची दाट शक्यता असते. कारण, असे पदार्थांमध्ये मसाला जास्त काळ टिकत नाही. जास्त मसाले आणि तेलामुळे पदार्थ खराब होतो. जर तुम्हाला एखादा पदार्थ जास्त वेळ टिकावा असे वाटत असेल तर मसाला कमी वापरा.  

अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका

थंड पदार्थ खाणे कोणालाच आवडत नाही. अशा परिस्थितीत लोक अन्न पुन्हा पुन्हा गरम करतात. यामुळे अन्न लवकर खराब होऊ शकते. अनेक वेळा अन्न पुन्हा गरम केल्याने चवीत फरक पडतो. (Kitchen Hacks)

ताज्या भाज्या वापरा

ताज्या साहित्याचा वापर करा. जर तुम्ही ताज्या भाज्या वापरल्या तर ती भाजी जास्त वेळ चांगली राहील. बऱ्याचवेळा आपण शिळी फळ किंवा पालेभाज वापरतो. त्यामुळे बनवलेली भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत फ्रेश राहत नाही. भाजी बनवताना ती फ्रेश असेल याची काळजी घ्या.   

शिल्लक राहीलेली भाजी

भाजी खराब होण्याचे आणखी एक कारण म्हणजे इतर प्लेट्समध्ये उरलेली भाजी शिल्लक असलेल्या भाजीत मिक्स करणे. उष्टी भाजी चांगल्या भाजीत मिक्स केली की तर असेलली भाजीही खराब होते.  

फ्रिजशिवाय भाजी अशी ठेवा ताजी

बनवलेला पदार्थ दुसऱ्या दिवशीही खाता येईल यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्याचा सल्ला सगळेच देतात. मात्र, ज्यांच्याकडे फ्रीज नाही असे लोक भाजीचे भांडे एका मोठ्या पातेल्यात पाणी भरून त्यामध्ये ठेवतात. रात्रभर असे पाण्यातल्या भांड्यात भाजी ठेवल्याने ती चांगली राहते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT