How to Store Milk Malai sakal
लाइफस्टाइल

तूप तयार करण्यासाठी दुधाची मलई साठवताय? दुर्गंध टाळण्यासाठी फॉलो करा 4 टिप्स

How to Store Milk Malai : कित्येक घरामध्ये आजही तूप पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते. पण फ्रीजमध्ये मलई साठवून ठेवल्यानं त्यास दुर्गंध येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी जाणून घेऊया उपाय...

सकाळ डिजिटल टीम

Malai Storing Tips In Marathi : दुधाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करून आपल्या देशामध्ये कित्येक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. दुधापासून पनीर, चीज, लोणी आणि तूपही तयार केले जाते. यापैकी तुपाचा आहारात समावेश केल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळतात. 

महत्त्वाचे म्हणजे घरगुती तुपाचे सेवन केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतात. कारण बाजारातील तूप भेसळयुक्त असल्याचे वृत्त अनेकदा ऐकू येते. पण घरच्या घरीही तूप तयार करताना लोकांना काही समस्या भेडसावतात. उदाहरणार्थ तूप तयार करण्यासाठी दुधाची मलई साठवली जाते. 

पण काही दिवसांतच मलईला घाणेरडा वास येऊ लागतो किंवा त्यावर बुरशी जमा होऊ लागते. मलई फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही समस्या निर्माण होतेच. या समस्यांवर तुम्हीही उपाय शोधत आहात का? चला तर जाणून घेऊया काही सोप्या टिप्स 

दुधाची मलई साठवताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात  

स्टीलच्या भांड्यात मलई साठवा

दुधाची मलई आपणास दीर्घ काळासाठी साठवून ठेवायची असेल तर यासाठी स्टीलच्या भांड्याचा वापर करावा. अन्य कोणत्याही भांड्याचा वापर करत असल्यास ते भांडे फ्रीजर प्रूफ आहे की नाही? हे एकदा तपासून घ्या. स्टीलच्या भांड्यामध्ये मलई दीर्घकाळ फ्रेश राहते.  

मलई डीप फ्रीज स्टोअर करा  

आपणास मलई 20 ते 30 दिवस मलई साठवून ठेवायची असेल तर मलईचा डबा डीप फ्रीज स्टोअर करा. यामुळे मलईवर बॅक्टेरिया वाढणार नाही, शिवाय ते खराबही होणार नाही.  

भांड्याला तूप लावा

मलई साठवून ठेवण्यासाठी ज्या डब्याचा वापर करणार आहात, त्या भांड्याच्या आतील बाजूस थोडेसे तूप लावावे. असे केल्यास मलई अधिक काळ टिकून राहते. 

मलईचा डबा झाकून ठेवा  

जेव्हाही आपण मलई साठवून ठेवाल तेव्हा डब्यावर झाकण लावण्यास विसरू नका. यामुळे मलई खराब होणार नाही.  शिवाय दुर्गंधीची समस्याही उद्भवणार नाही. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

Success Story: रोज आठ ते दहा आभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT