Kitchen Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : किचनमधील या वस्तू कधीच फेकून देऊ नका, कारण...

मुलांसाठी लागणारे नाश्त्याचे पदार्थ, पीठे आपण योग्य पद्धतीने साठवतो

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Tips :

घरी बाजारातून आणलेल्या अनेक वस्तू आपण एक्स्पायरी डेट बघून घेतो. साधारण, पॅकेट वस्तू सॉस अशा वस्तूंबाबत आपण रिस्क घेत नाही. कारण, ते आपल्या मुलांशी संबंधित असतात. मुलं आवडीने सॉस, जाम अन् बऱ्याच वस्तूंशिवाय जेवत नाहीत.

मुलांसाठी लागणारे नाश्त्याचे पदार्थ, पीठे आपण योग्य पद्धतीने साठवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या किचनमध्ये असलेल्या काही वस्तू कधीच खराब होत नाहीत. होय हे खरं आहे. घरी मंच्युरियन साठी असलेले कॉर्नफ्लोअर, मध, सोया सॉस या वस्तू कधीच खराब होत नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट संपली तरी देखील त्या वापरण्या योग्य असतात. (Kitchen Tips)

कॉर्नफ्लोअर

तुम्ही काही नाश्त्याचे पदार्थ बनवण्यासाठी कॉर्नफ्लोअर घरी आणत असाल. काही दिवस ठेऊन ते खराब झाले म्हणून फेकून देत असाल तर तसं करू नका. कारण, कॉर्नफ्लोअर कधीच खराब होत नाही. फक्त तो हवाबंद काचेच्या डब्यात ठेवा. म्हणजे त्याला किडे लागणार नाहीत.    

व्हिनेगर

व्हिनेगर हे कोशिंबिर, लोणचे यासाठी तर पॅकेट फूड असलेल्या टोमॅटो केचअप, सॉस, मेयोनीज यामध्ये वापर केला जातो. घराची स्वच्छता, एखाद्या भांड्याला चमकवण्यासाठीही त्याचा वापर केला जातो. असे हे व्हिनेगर कधीच खराब होत नाही. फक्त काळजी घ्यावी की ते तुम्ही योग्य प्रकारे साठवून ठेवाल.(Kitchen Hacks)

सोया सॉस

सोया सॉस शिवाय चायनिज फूड तयारच होत नाही. घरी बनलेल्या फ्राईड राईस, मंच्युरियन आणि नुडल्समध्ये हा सॉस सर्रास वापरला जातो. तुम्हीही बाजारातून आणलेला सॉस खराब झाला म्हणून फेकून देत असाल तर आधी हे लक्षात घ्या. कारण, सोया सॉस कधीच खराब होत नाही.

मध

आयुर्वेदीक औषध असो वा ब्युटी टीप्स सगळ्याच गोष्टीत मध वापरला जातो. आजकाल झाडावरून तोडलेला ताजा मध ग्रामिण भागात मिळतो. पण शहरात मात्र प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेला मिळतो. त्य पॅकेटवर त्याची एक्स्पायरी डेटही असते. असे असले तरी हे लक्षात घ्या की मध कधीही खराब होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी डोळे झाकून तो वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold 2026: सोनं वाढेल की घसरेल? ‘भाव पडल्यावर खरेदी’चा मोतीलाल ओसवालचा सल्ला

Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात झळकणार गायक अतुल गोगावलेचा लेक, गाण्यात दिसली झलक

RCB vs DC: फॉर्ममध्ये असलेल्या बंगळुरूविरुद्ध अक्षर पटेलने जिंकला टॉस! बर्थडे बॉय केएल राहुलकडे असणार लक्ष; पाहा Playing XI

MPSC Success : दगड फोडणाऱ्याची मुलगी झाली अधिकारी! लोणीच्या मोहिनीची महसूल सहाय्यकपदावर झेप; तिचा संघर्ष वाचून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT