know these 7 tips for teach Discipline to children
know these 7 tips for teach Discipline to children  
लाइफस्टाइल

मुलांना शिस्त लावायची आहे? मग 'या' सात क्रिएटिव्ह टिप्सचा वापर नक्की करा

सुस्मिता वडतिले

पुणे : मुलांना शिस्त शिकवण्याकडे दुर्लक्ष करणे प्रत्येक पालकांसाठी डोकेदुखी होऊन जाते. जिथे आमच्या पिढीला शिस्त शिकवण्यासाठी पालक कमी बोलायचे आणि त्यांचे हात पाय अधिक चालायचे, आता जर त्या गोष्टींची चर्चा झाली तर ते फक्त चर्चाच बनून जातात. शिस्त शिकवण्याची जुनी परंपरा आता मुलांना बंडखोर बनवत चालली आहे. येथे आम्ही मुलांना शिस्त लावण्याचे सकारात्मक (पॉझिटिव्ह ) मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे ते केवळ शिस्तबद्धच राहणार नाहीत तर एकमेकांना प्रेम कसे द्यायचे हे देखील शिकतील.

जर मुलं खेळणी अस्थाव्यस्थ पसरून ठेवतात

सर्वच मुलांना खेळणी आवडतात. जर त्यांनी त्यांची खेळणी एका जागेवर ठेवली नसतील. तर तुम्ही त्यांच्या खेळणी इकडे-तिकडे फेकू  नका. त्यांना एखादा खेळ खेळतच खेळणी एका जागेवर कशी ठेवायच्या हे त्यांना शिकवा. एक टाईमर ठेवा आणि त्यांना गोष्टी व्यवस्थित ठेवण्यास सांगा. त्यांनी वेळेत काम पूर्ण केल्यानंतर त्यांना बक्षीस द्या. 

मुलं जर नखरे करत असतील तर

जर तुमची मुले नखरे करत असतील तर तुम्ही समजून जा की ते मानसिकरीत्या अस्वस्थ आहेत. ते एकतर खूप रागावतात किंवा अत्यंत दुःखी होऊन जातात. अशावेळी त्यांना मारणे योग्य ठरणार नाही. तुम्ही जादू की झप्पी (हग करा) द्या. तुमच्या स्नेह आणि प्रेमाने लगेचच त्यांचे भावनिक चढ-उतार कमी होतील. अशावेळी ते एका क्षणात पाहिल्यासारखे नॉर्मल झाले नाही तर विचारा.

जर मुलं जास्त आगाऊपणा करत असतील तर 

बर्‍याचदा मुले त्यांच्यापेक्षा वयाने लहान मुलांना किंवा त्यांच जे ऐकतात त्यांना रुबाब दाखवण्यास सुरवात करतात. अशा परिस्थितीत काय करावे? आपण जास्त बोलो तर त्या मुलांना आणखी त्रास होऊ शकतो. त्यांना काही अधिकार देऊन त्यांना स्वतःला महत्वाचे वाटू द्या. यानंतर त्यांच्या वयाची मुले सहसा सहजपणे करू शकत नाहीत असे कोणतेही काम करण्याची जबाबदारी त्यांना द्या. ते जबाबदारीने ते काम करण्यात मग्न होऊन जातील. यावेळी तुम्ही त्यांच्याकडे पहाल तर तुम्हाला जाणवेल की, अशी जबाबदारी दिल्यास तुमच्या मुलात बदल झालेले दिसून येतील. 

जर मुलगा जेवण करताना ऐकत नसेल तर 

जर तुमची मुले जेवताना एकत्र नसतील तर तेव्हा त्यांना ठिक करण्यासाठी एक मस्त आयडीया आहे. सहसा मुले खाण्याआधीच नखरे करतात. अशावेळी त्यांना प्रेमाने आग्रह करा की ते सुरवातीला खाण्याचा प्रयत्न करावेत, जर त्यांना ते आवडत नसेल तर ते खात नसतील तरीही चालेल. हो, त्या बदल्यात त्यांना दुसरं काही तरी खायला द्या. हे करत असताना तुम्हाला दोन ते तीन डिश बनवाव्या लागतील जेणेकरून ते भुकेले राहणार नाहीत. या पद्धती फॉलो केलयास तीन चांगल्या गोष्टी होतील. पहिली म्हणजे मुले भुकेले राहणार नाही, दुसरी म्हणजे जर त्यांनी बर्‍याच डिशची चव चाखली तर त्यांना सगळ्या चव चाखता येतील आणि तिसरी म्हणजे ते खाण्यांच्या नावाने नाटक करणार नाहीत.

होमवर्क करणे हे मोठे काम असेल तर

बहुतेक मुले होमवर्क करण्याच्या नावाखाली पळून जातात. अशा परिस्थितीत त्यांचे पालक त्यांना सक्तीने अभ्यासाच्या टेबलावर बसवतात. बर्‍याच वेळा मुले गोंधळामध्ये होमवर्क करतात आणि वाईट गोष्ट म्हणजे ते काहीही न करता तासनतास बसून राहतात. बर्‍याच पालकांना त्यांच्या मुलांना चांगल्या मुलांबरोबर तुलना करून त्यांना प्रोत्साहित करण्याची इच्छा असते, यामुळे मुले आणखी चिडचिडी होतात. मुलांसोबत जबरदस्तीने किंवा दुसऱ्यांसोबत तुलना करण्याऐवजी तुम्ही त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण केली पाहिजे.

मुलांना वेळेचे महत्त्व समजत नसेल तर 

काही मुलांना वेळेचे महत्त्व समजत नाही. 'हो, दोन मिनिटात येत आहे' असं म्हणत ते तासन तास खेळू लागतात. जर अशा सवयी बालपणात सुधारल्या नाहीत तर मुले आयुष्यभर सैल होतात आणि काळानुसार गोंधळून जातात. मुले असे करत असल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या आवडत्या कामाचा वेळ कमी करा. जेव्हा त्यांना त्यांच्या आवडीच्या कामासाठी वेळ मिळत नसेल तेव्हा ते इतर वेळेचे महत्त्व समजतील .

जर मुलांना लबाड (खोटं) बोलायचं सवय लागली असेल तर

मुले एका फ़ैंटसी वर्ल्ड (कल्पना रम्य) जगात राहत असतात, ज्यामुळे काही गोष्टींचा विचार न करता खोटे बोलणे त्यांची सवय बनून जाते. जर मुलास कल्पना  आणि रियॅलिटी (वास्तविकते) मध्ये फरक करता येत नसेल तर तो सवयीने लबाड बनतो. वास्तविक जीवनाशी संबंधित गोष्टीही तो जास्त करून सांगत असतो. या सवयीपासून लांब जाण्यासाठी एक गोष्ट करा मुलाला यावेळी योग्य वापर करण्यास शिकवा. त्याला गोष्टी लिहिण्यासाठी प्रेरणा द्या. त्याला एका वहीमध्ये लिहिण्यास सांगा. अशा प्रकारे तो रियल आणि कल्पित जगामध्ये फरक कस करायचं या गोष्टी शिकेल. असे केलया तुमची मुलं एक उत्तम लेखकही  बनतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT