लाइफस्टाइल

हॉट टॉवेल स्क्रब ट्राय केलंय? पाहा त्याचे शारीरिक फायदे

घरीही करता येईल हॉट टॉवेल स्क्रब

शर्वरी जोशी

बदलतं वातावरण,वाढतं प्रदूषण, चुकीची आहारपद्धती याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर होत असतो. त्यातूनच मग अनेकांच्या चेहऱ्यावर डेडस्कीन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स किंवा मग त्वचेवरील पोर्स ओपन होतात. त्यामुळे मग पार्लरमध्ये जाऊन किंवा घरीच आपण वेगवेगळे स्क्रब ट्राय (Many Types Of Scrubs) करतो. परंतु, हे स्क्रब केल्यावर केवळ तात्पुरता फरक जाणवतो. त्यानंतर काही दिवसांत पुन्हा ही समस्या डोकं वर काढते. मात्र, तुम्ही कधी हॉट टॉवेल स्क्रब (Hot Towel Scrub) ट्राय केला आहे का? डेडस्कीन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सची समस्या दूर करण्यासोबतच चेहऱ्यावरील थकवा, ताणदेखील या स्क्रबमुळे दूर होतो. म्हणूनच हा स्क्रब नेमका कसा करतात ते जाणून घेऊया. (know what is hot towel scrub and what are its benefits)

हॉट टॉवेल स्क्रब (Hot Towel Scrub) करण्यासाठी दरवेळी तुम्हाला पार्लरमध्ये किंवा सॅलॉनमध्येच जाण्याची आवश्यकता नाही. तर, घरच्या घरीदेखील हे स्क्रब करता येऊ शकतं. त्यामुळे स्वस्तात मस्त हे स्क्रब कसं करायचं ते पाहुयात.

हॉट टॉवेल स्क्रब म्हणजे नेमकं काय?

हॉट टॉवेल स्क्रब ही एक प्रकारची ट्रीटमेंट आहे. यामध्ये टॉवेल गरम पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर या ओल्या टॉवेलने शरीरावर हलक्या हाताने मसाज करा. हा स्क्रब शरीरावर सर्कुलर मोशन पद्धतीने केला जातो. ज्यामुळे शरीरावरील पोर्स, मसल्स आणि त्वचेवरील रंध्रे मोकळे होतात. तसंच हॉट टॉवेल स्क्रब करतांना कायम सुती टॉवेल घ्यावा.

त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात -

हॉट टॉवेल स्क्रब केल्यामुळे हात, चेहरा किंवा शरीरावरील त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. या स्क्रबमुळे मांसपेशींना आराम मिळतो. त्याचबरोबर रक्ताभिसरणदेखील चांगल्याप्रकारे होते.मृतत्वचादेखील निघून जाते.

रक्ताभिसरण सुरळीत होतं-

या स्क्रबमुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यास मदत मिळते.

ताणतणाव दूर होतो -

या स्क्रबमुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. तसंच शरीराला रिलॅक्सेशन मिळतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT