Kurdaichi Bhaji Recipe  esakal
लाइफस्टाइल

Kurdaichi Bhaji Recipe : श्रावणी सोमवार सोडण्यासाठी बनवा चटपटीत,चटकदार आगळी-वेगळी अशी कुरडईची भाजी

प्रत्येकवेळी कुरडई तळून खाल्ली असेल, आज तिची भाजीही बनवून पहा,रेसिपी सोपी अन् पटकन होणारी

सकाळ डिजिटल टीम

Kurdaichi Bhaji :

अनेकवेळा घरात काहीच भाजी शिल्लक नसते. किंवा काहीतरी बनवून खाणं वेळखाऊ वाटतं. सततच्या भाजीचाही कंटाळा येतो. तेव्हा तुम्ही घरात असलेली कुरडईची भाजी बनवू शकता.

आज श्रावणातील चौथा शनिवार आहे. सर्वांच्याच घरी श्रावणात वेगवेगळे बेत बनलेले असतात. तुम्हीही श्रावणी सोमवार स्पेशल भाजी काय बनवायची याचा विचार करत असाल तर कुरडईची भाजी नक्की करून पहा. (Kurdaichi Bhaji Recipe )

कुरडईची भाजी बनवण्यासाठीचे साहीत्य आणि कृती

१ वाटीभर कुरडयांचा चुरा, कांदा बारीक चिरून, हिरव्या मिरच्या चिरून, १ टी स्पून धणे-जिरे पूड, मीठ, साखर, १ टोमॅटो चिरून, १ टी स्पून गरम मसाला, अर्धा टी स्पून लाल तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, कोथिंबीर

कृती :

गरम पाण्यात कुरडयांचे तुकडे घालून १५ मिनिटे झाकून ठेवावेत

कढईत तेल, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करून कांदा परतावा.

त्यात लाल तिखट, मिरच्यांचे तुकडे, गरम मसाला, धणे-जिरे पावडर घालावी.

मीठ, साखर घालून, चिरलेला टोमॅटो घालून भिजवलेल्या कुरडया व १ वाटी पाणी घालून भाजी उकळल्यावर कोथिंबीर घालून उतरवावी. गरम गरम चपाती किंवा भाकरीसोबत खावी.

कुरडईची कोशिंबीर

कुरड्यांचा चुरा उकळत्या पाण्यात उकडून, शिजवून चाळणीवर निथळवावा. गार झाल्यावर त्यात एक कांदा बारीक चिरून, १ हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, साखर, कोथिंबीर घालून १ वाटी गोड घट्ट, दही घालावे ढवळून वरून तेलाची मोहरी, हिंगाची गार फोडणी घालावी छान कोशिंबीर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

महत्त्वाचे अपडेट्स : IPL आता मार्च-मे मध्ये नव्हे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार? दोन टप्प्यातही होऊ शकतं आयोजन; नेमकं कारण काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

Samruddhi Mahamarg Car Fire : समृद्धी महामार्गावर धावती इलेक्ट्रिक टाटा नेक्साॅन कार अचानक पेटली; कारमधून बाहेर पडताच..., पाहा नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT