Parenting Tips Sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांच्या वर्तणूक समस्येमागे योग्य पालकत्वाचा अभाव; कशी टाळाल मुलांतील दादागिरी प्रवृत्ती

Parenting Tips: मूल घडविण्यात पालक व शिक्षकांचे मोठे योगदान असते व एकंदरीत कौटुंबिक व शाळेच्या वातावरणाचा मुलांवर प्रभाव असतो.

सकाळ वृत्तसेवा

लहान मूल धमकावणे, रागावणे या गोष्टी बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मोठ्यांकडून शिकतात. वेळीच या वागण्याला रोखले नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे पालकांनी जाणावे. मूल घडविण्यात पालक व शिक्षकांचे मोठे योगदान असते व एकंदरीत कौटुंबिक व शाळेच्या वातावरणाचा मुलांवर प्रभाव असतो. मुलांच्या वर्तणूक समस्येमागे योग्य पालकत्वाचा अभाव, परिवारातील वाद, कौटुंबिक हिंसा व शाळेतील वातावरण असू शकते.

शालेय वयात मुलांची मानसिक जडणघडण सुरू असते. त्यामुळे अनुभवलेल्या छेडछाडीचा दूरगामी परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. शाळेतील हिंसेमुळे मूल आत्मविश्वास गमावण्याचा धोका राहतो. मुलांची स्वप्रतिमा बाधित झाल्यामुळे पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.

त्यामुळेच शाळेने, शिक्षकांनी व पालकांनी त्याला एकजुटीने रोखावे. मुलाच्या वागण्यात अचानकचा बदल, जसे शाळा टाळणे, उदास असणे, मित्रांना टाळणे, सतत पोटदुखी किंवा डोकेदुखीचा बहाणा करणे, उगाच घाबरणे, झोप व भूक हरपणे इ. अशावेळी मुलाला विश्वासात घ्यावे. समस्येच्या मुळाशी जाऊन शाळेशी संपर्क साधावा व हिंसा लगेच थांबेल, यासाठी प्रयत्न करावा. मुलाला शाळेकडून योग्य आधार, समुपदेशन मिळेल यासाठी आग्रही राहावे.

मुलांमध्ये नैराश्य असल्यास शैक्षणिक अक्षमता असल्यास, शारीरिक व्यंग असल्यास त्याला समुपदेशन मिळेल, हे पाहावे जेणे करून त्याची स्वप्रतिमा सकारात्मक होईल. मुलाच्या शालेय प्रगतीसाठी योग्य ती मदत करा. मुलाला अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, खेळ, छंदवर्गामध्ये प्रोत्साहन द्यावे. त्याच्यातली कौशल्ये घडविण्यास मदत करा, जेणे करून त्याचा आत्मविश्वास वाढेल. मूल कौतुकाने बदलते टीकेने नव्हे, हे समजून त्याच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन द्यावे.

मुले अशा प्रकारची करतात हिंसा

शारीरिक हिंसा-मारहाण करणे, ढकलणे, चिमटा काढणे, वस्तू तोडणे.

शाब्दिक हिंसा-टोपण नावाने चिडवणे, शिवीगाळ करणे.

मानसिक हिंसा-अफवा पसरवणे, एकटे पाडणे.

सायबर हिंसा-अश्लील ई-मेल पसरवणे, बदनामी करणारा मजकूर, पोस्ट किंवा लाजिरवाणा फोटो शेअर करणे.

मूल हिंसा करत असेल, तर काय कराल?

मुलांशी चर्चा करा, त्याला याचे गांभीर्य समजवा व परिणाम समजावून त्याला त्वरित हे वागणे थांबविण्यास प्रवृत्त करा. आपले मूल असे का वागले, त्याचे कारण शोधा. समजून घ्या की, मुलाला कोणी आधी छळले होते का? त्याच्या वागण्याचा निषेध करा, मुलाचा नव्हे. मुलाला समजून घ्या; परंतु हे वागणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे, हे ठामपणे जाणवू द्या. मुलाला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होण्यास संधी द्या. शिक्षकांना भेटून हे वागणे कसे टाळता येईल, यासाठी प्रयत्नशील राहा. पालकांनी व घरातील मोठ्यांनी मुलाशी वागण्यात एकवाक्यता आणावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT