Lemon Water:  Sakal
लाइफस्टाइल

Lemon Water: 'या' 5 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी, वाचा कारण

Lemon Water: कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिणे टाळावे.

Puja Bonkile

Lemon Water who should not drink lemon juice

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे फायदेशीर असते. अनेक लोक सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पितात. यामुळे शरीर डिटॉक्स होते. तसेच वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकराशक्ती वाढते. लिंबूपाणी अनेक आजारांना दूर ठेवते. पण सर्वच लोकांसाठी लिंबूपाणी फायदेशीर नसून घातक ठरू शकते.

कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिऊ नये

  • अॅसिडिटीची समस्या

जर तुम्हाला अॅसिडिटीचा समस्या असेल तर लिंबू पाणी पिऊ नका. कारण त्यात सायट्रिक अॅसिड जास्त प्रमाणात असते. यामुळे शरीरात अॅसिडीटी वाढू शकते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात.

  • दातासंबंधित समस्या

ज्या लोकांना दातासंबंधित समस्या असतात त्यांनी लिंबू पाणी पिणे टाळावे. लिंबूमध्ये असलेले अॅसिड दातांवर केलेले उपचार खराब करू शकते. यामुळे दातांचे दुखणे वाढू शकते. यामुळे दाताच्या समस्या असलेल्या लोकांना लिंबू पाणी पिणे टाळावे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • हाडांच्या समस्या

हाडांशी संबंधित समस्या असेल तर लिंबू पाणी पिणे टाळावे. यामुळे हाडांची झीज होऊ शकते. लिंबामध्ये असलेले आम्ल हाडामध्ये जमा झालेले कॅल्शियम झपाट्याने नष्ट करू शकते. हे युरिनद्वारे बाहेर येऊ शकते. यामुळे हाडे कमकुवत होऊन पोकळ होऊ शकतात. यामुळे अपघातात हाडांना दुखापत झाल्यास लवकर नीट होत नाही.

  • किडनी

तुम्हाला किडनी संबंधित आजार असेल तर लिंबूपाणी पिणे टाळावे. यामुळे किडनीवर अधिक दबाव येऊ शकतो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला आधीच किडनी संबंधित समस्या असेल तर चुकूनही लिंबू पाणी पिऊ नका.

  • छातीत जळजळ होणे

जर तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही चुकूनही लिंबू पाणी पिऊ नका. असे केल्याने पेप्सिन नावाचे एन्झाइम सक्रिय होऊ शकते. यामुळे पेप्टिक अल्सरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लिंबू पाण्याचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष होताच हातात झाडू घेऊन मैथिली तांबे उतरल्या थेट संगमनेरच्या रस्त्यावर

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT