Sleeping  sakal
लाइफस्टाइल

Lifestyle: सकाळी लवकर जाग येण्यासाठी 'या' तीन गोष्टी आचरणात आणा

सकाळी झोपेतून उठणे ही खुप लोकांसमोर एक आव्हानात्मक गोष्ट असते.

सकाळ डिजिटल टीम

सकाळी झोपेतून उठणे ही खुप लोकांसमोर एक आव्हानात्मक गोष्ट असते. पहाटेची ती साखरझोप आणि त्यानंतर लागणारी गाढ झोप अनेकांना प्रिय असते. पण त्यातच अलार्म वाजला की आपला सगळा मूड जातो आणि आपण कसेबसे वैतागुन उठतो.

अलार्म न लावता जाग येणं ही तर अनेकांसाठी अतिशय अवघड गोष्ट असते. रात्री उशीरा झोपणे, विविध गोष्टींचा मानसिक ताण, सततच्या आरोग्याच्या तक्रारी, मोबाइलचे अतिव्यसन यामुळे रात्री लवकर झोप येत नाही आणि मग सकाळी काही केल्या जाग येत नाही. मात्र असे झाले की आपली प्रचंड चिडचिड होते, कारण आपोआप मग दिवसाची पुढची सगळी कामे लांबत जातात.

घरातली कामे, ऑफीस, मिटींग्ज त्यात लागणारी ट्रॅफीक आणि इतर अनेक गोष्टींचे नियोजन बिघडते. म्हणूनच आपल्यालाही बिनाअलार्म जाग यावी असं तुम्हाला वाटत असेल तर या 3 गोष्टीचा तुमच्या दैनंदिन जिवनात समावेश करून घ्या.

चला मग आता पाहूया या कोणत्या आहेत त्या तिन गोष्टी...

मेडीटेशन करण्याची सवय लावावी.

मेडीटेशनसाठी 4-7-8 ही पद्धत आवर्जून वापरा. रात्री झोपताना या पद्धतीने मेडीटेशन केल्यास लवकर झोप येईल आणि त्याचा मन शांत होण्यासही चांगला फायदा होईल. 4 सेकंद दिर्घ श्वास घ्यावा. नंतर 7 सेकंद श्वास रोखून धरावा आणि 8 आकड्यात श्वास सोडा. हेच पुन्हा पुन्हा करा. यामुळे मन, शरीर, मेंदू सगळे शांत होईल आणि लवकर गाढ झोप लागेल. वेळेत झोप लागली की सकाळी वेळेत जाग येण्यासाठी अलार्मची गरज भासणार नाही.

रात्री जेवनात हलका आहार घ्यावा.

सकाळचा आहार जास्त असला तरी चालतो मात्र रात्री झोपताना हलका आहार घ्यायला हवा. रात्री हलका आहार घेतला आणि लवकर खाल्ले तर अन्न लवकर पचते आणि शांत, गाढ झोप लागायला त्याची चांगली मदत होते. तसेच हलके खाल्ल्यामुळे अॅसिडीटी किंवा अपचन यांसारखे त्रास दूर राहण्यास मदत होईल. हलका आहार घेतला तर शरीर तो लवकर पचवते आणि शरीराला ताण येत नाही. त्यामुळे नकळत आपण वेळेत उठण्यास मदत होते.

रात्री झोपण्याआधी सोशल मिडियापासून थोडे दूर राहावे.

सध्य़ा आपली असंख्य कामे ही उपकरन अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्या हातात सतत मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट असे काही ना काही असतेच. या गोष्टींच्या वापराचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर विपरीत परीणाम होत असतो. मात्र आपण तंत्रज्ञानाच्या इतके आहारी जातो की आपल्याला कित्येक गोष्टी लक्षातही येत नाहीत. अनेकदा या उपकरणांमुळे आपली झोप उडते आणि मग आपल्याला सकाळी झोप आवरता आवरत नाही. मात्र रात्री टेक्नॉलॉजीपासून दूर राहिल्यास आपली झोप चांगली होते आणि आपल्याला सकाळी नकळत वेळेत जाग येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT