काही दिवसांमध्येच श्रावण महिना सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या अनेकांच्या घरी आतापासूनच गटारीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक जण दररोज नॉनव्हेजचे नवनवीन पदार्थ तयार करत आहेत. मात्र, बऱ्याचदा या नॉनव्हेज पदार्थांमध्ये कितीही मसाले किंवा नव्या ट्रिक्स वापरल्या तरीदेखील त्याची चव बिघडल्यासारखीच वाटते. मात्र, हा पदार्थ नेमका का बिघडतोय हे अनेकांच्या लक्षात येत नाही. परंतु, चिकन फ्रेश नसेल तर नक्कीच त्या पदार्थाची चव बिघडू शकते. म्हणूनच, चिकन फ्रेश आहे की नाही हे कसं ओळखावं ते पाहुयात. (lifestyle how to buy fresh chicken from market)
१. वास -
चिकन खरेदी करताना त्याचा वास चेक करा. साधारणपणे अर्ध्या तासापूर्वी चिकन कापून ठेवलं असेल तर त्याला वास येत नाही. पण जर चिकन शिळं असेल तर त्याला दुर्गंधी येते.
२. फ्रिजमधील चिकन -
बऱ्याचदा चिकन खरेदी करताना दुकानदार फ्रिजमध्ये स्टोर केलेलं चिकन ग्राहकांना देतो. मात्र, असं स्टोर केलेलं चिकन कधीच खरेदी करु नका. कारण, फ्रिजमध्ये ठेवलेलं चिकन शिळं असू शकतं. या शिळ्या चिकनमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. तसंच पदार्थाची चवही बिघडू शकते.
३. रंग -
चिकन खरेदी करताना कायम त्याचा रंग चेक करा. जर चिकनचा रंग हलका गुलाबी असेल तर ते चिकन चांगलं व फ्रेश आहे. तसंच जर चिकनमध्ये रक्त दिसत असेल तर ते फ्रेश आहे. पण, चिकनमध्ये रक्त दिसत नसेल तर ते शिळ चिकन आहे.
४. पाकिटातील चिकन-
पाकिटबंद चिकन खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट चेक करा. तसंच चिकन शिजवण्यापूर्वी त्याचा वास चेक करा. कारण, अनेकदा एक्सपायरी डेट उशीराची असूनही चिकनला दुर्गंधी येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.