लाइफस्टाइल

आर्थिक चणचण जाणवतेय?; अशी करा पैशांची बचत

शर्वरी जोशी

कोरोनामुळे (coronavirus) ओढावलेल्या संकटाचा फटका कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रांना बसला आहे. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पगार कपात केली आहे. असंख्य कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं आहे. त्यामुळे या काळात अनेक जण आर्थिक संकटाला सामोरं जात आहेत. मात्र, पगार जरी कमी येत असला तरीदेखील पैशांचं योग्य नियोजन केलं तर या आर्थिक संकटावरही सहज मात करता येऊ शकते. म्हणूनच, लॉकडाउनच्या काळात आर्थिक नियोजन किंवा आर्थिक बचत कशी करावी हे आज जाणून घेऊयात. (lockdown-how-to-save-money-even-when-salary-is-irregular)

१. बचतीची शिस्त लावा -

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वत: ला बचत करण्याची शिस्त लावा. यापूर्वी आपण असंख्य वायफळ गोष्टींवर खर्च केला असेल. मात्र, सध्याच्या काळात १-१ रुपया जपून वापरायला हवा. म्हणूनच, आपले अवाजवी खर्च कमी करुन बचत करण्याकडे अधिक कल द्या. कारण, आज केलेली बचत तुम्हाला उद्या उपयोगी पडू शकते. कोरोनाचं सावट कधी दूर होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे पुढे उद्भवणारं संकटही आपल्याला माहित नाही. म्हणूनच, ऐनवेळी दुसऱ्यांकडे हात पसरु लागू नयेत म्हणूनच आजच बचतीला सुरुवात करा. अगदी महिन्याला २-३ हजारांची बचत करणं शक्य नसलं तरीदेखील ५००- हजार रुपये नक्कीच सेव्ह करता येऊ शकतात.

२. इमर्जन्सी फंड -

गरजेच्या वेळी कधीही उपयोगी पडणारा पैसा म्हणजे इमर्जन्सी फंड. यासाठी एका चांगल्या विमा एजंटकडून पॉलिसी काढून घ्या. ज्यामुळे लग्नकार्य, मुलांचं शिक्षण, आजारपण यासाठी गरज लागल्यास लगेच पैसे काढता येऊ शकतात.

३. उत्पन्नाचा एकच स्त्रोत नको -

बऱ्याच घरांमध्ये आजही एकच व्यक्ती पैसे कमावते. त्यामुळे सहाजिकच संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक भार हा एकाच व्यक्तीच्या खांद्यावर असतो. म्हणूनच, जर घरातील दोन व्यक्ती कमावते असतील तर खर्चाचा भार हलका होतो. त्यामुळे जर पती-पत्नी दोघंही कमवत असतील तर एकाच्या पगारात घर खर्च केला जाऊ शकतो. तर, दुसऱ्याचा पगार सेव्हिंगमध्ये टाकला जाऊ शकतो.

४. विमा पॉलिसी -

आपल्या आयुष्यात कधी कोणता प्रसंग उभा राहिल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे अडीअडचणीच्या वेळी बॅंक बॅलन्स असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच विमा पॉलीसी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT