Lok Sabha Election 2024: Sakal
लाइफस्टाइल

Lok Sabha Election 2024: चला मतदान करू या, समृद्ध भारत घडवू या

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत घटलेला टक्का लक्षात घेता, निवडणूक आयोग आणि प्रशासन प्रचार आणि प्रसारात गुंतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Lok Sabha Election 2024

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ज्युनिअर चार्ली चॅप्लिन फाऊंडेशनने मतदान करा हे सांगण्यासाठी राज्यभर अभियान सुरु केले आहे. मुंबई, पुणे येथून सुरवात केलेल्या अभियानामध्ये दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगराच्या विविध भागात ज्युनिअर चार्ली टीम मतदान करा हे सांगत आपल्या अभिनयाने लोकांना आकर्षित करत आहे.

लोकसभा निवडणुकीत घटलेला टक्का लक्षात घेता, निवडणूक आयोग आणि प्रशासन प्रचार आणि प्रसारात गुंतले आहे. या कामात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी ज्युनिअर चार्ली चॅप्लिन फाऊंडेशनच्या ११ चार्लीच्या टीमने मतदान करा हे सांगण्यासाठी शहरातील गुरुवारी (ता. २५) क्रांती चौक येथून अभियानाला सुरवात केली.

सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचे उद्‍घाटन केले. त्यानंतर शहरातील विविध भागात, पोलिस ठाण्यात, मॉलमध्ये, दुकानांमध्ये, बाजारपेठेत अशा अनेक ठिकाणी जावून मतदान करण्याचे आवाहन केले. ज्युनिअर चार्लीच्या मूक अभिनयातून आणि हातात फलक घेत मतदान करा, मतदानाची सुटी एन्जॉय करण्यासाठी नाही, लोकशाही बळकट करा असे आवाहन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT