Mahashivratri 2024 esakal
लाइफस्टाइल

Mahashivratri 2024 : हर हर महादेव! जाणून घ्या महाशिवरात्रीचे महत्त्व आणि मुहूर्त

उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो

सकाळ डिजिटल टीम

Mahashivratri 2024 :

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. यंदाच्या वर्षी महाशिवरात्री कधी आहे हे जाणून घेऊयात.

महाशिवरात्री दिवशी एकादशीचा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकरांची आराधना करून फराळ केला जातो. तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडाधोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.

वर्षातील १२ शिवरात्री

वर्षातील १२ महिन्यात एक शिवरात्री येते. पण त्यापैकी फेब्रूवारी-मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता.

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते. व्रत पाळताना ही पूजा केली जाते. महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.

त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर दही थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

महाशिवरात्रीचा मुहूर्त

पंचागानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला ८ मार्चला २०२४  रोजी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होणार असून ९ मार्च २०२४ सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होणर आहे. 

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी ८ मार्च रोजी रात्री ९.५७ पासून सुरू होईल आणि ९ मार्च रोजी संध्याकाळी ६.१७  पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार ८ मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT