Mahavir Jayanti 2024 Sakal
लाइफस्टाइल

Mahavir Jayanti 2024: ‘दान’ जैन जीवनाचा एक भाग

Mahavir Jayanti 2024: जैन धर्मानुसार ‘दान’ अतिशय महत्त्वाचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

मधुकर कांबळे

Mahavir Jayanti 2024

जैन धर्मानुसार ‘दान’ अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम ‘दान’ प्रथम तीर्थंकर श्री आदिनाथ भगवंताला राजा श्रेयांसने अक्षय तृतीयेला इक्षुरसाचे आहारदान दिले होते. अक्षयतृतीयेपासून दानाची परंपरा सुरू झाल्याचे मानतात.

नम् दुर्गती नाशमः अर्थातच दान दुर्गतीचा नाश करतो श्रावकाच्या सहा आवश्यक क्रियांमध्ये दान हे एक आवश्यक आहे. दान हे एक महत्त्वाचा पुण्यकारी कृत्य मानले जाते. दान केल्याने दान करणारी व्यक्ती त्याच्या कर्माचा नाश करू शकते आणि मोक्ष प्राप्त करू शकते, असे मानले जाते. दान हे गरजूंना मदत करण्याचा आणि जगाला अधिक चांगले बनविण्याचा एक मार्ग आहे.

रवी मुगदिया म्हणाले, ‘‘जैन धर्मात मुख्य चार दानांशिवाय दानाचे अनेक उपप्रकारदेखील सांगितलेले आहेत. त्यात आवासदान: निवारा देणे, वस्त्रदान: कपडे देणे, रोगीदान: रुग्णांची सेवा करणे, ज्ञानदान: शिक्षण देणे आणि अर्थदान: पैसा देणे असे उपप्रकार सांगितले आहेत. दान करताना, दान करणाऱ्याने शुद्ध मनाने आणि निःस्वार्थ भावनेने दान करणे महत्त्वाचे आहे. दान केलेल्या वस्तूंची किंमत किंवा प्रमाण महत्त्वाचे नाही; दान करण्यामागची भावना महत्त्वाची आहे. दान हे जैन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ते सर्व जैन धर्मावलंबींनी नियमितपणे केले पाहिजे.’’

पं. अजितकुमार महाजन यांनी सांगितले, ‘‘उमा स्वामींनी दानाची व्याख्या करताना स्व आणि परकल्याणासाठी धनाचा अतिसर्ग म्हणजे त्याग करणे याला दान असे म्हटले आहे; तसेच जे यासाठी पात्र आहेत अशांना दान द्यावे. श्रावकांनी रोज चार मुख्य दान दिले पाहिजेत.

दान केल्याने पुण्य प्राप्त होते, ज्यामुळे मोक्षप्राप्तीस मदत होते. कर्मक्षय: दान केल्याने कर्म नाश होतात. आत्मशुद्धी दान केल्याने मन शुद्ध होते आणि मोह आणि आसक्ती कमी होते. परोपकार दान केल्याने गरजूंना मदत होते आणि जगाला अधिक चांगले बनते. आनंद दान केल्याने दान करणारी व्यक्ती आनंदी आणि समाधानी होते. अभय-दानाला सर्वोत्तम म्हटले जाते. अन्नदान केल्याने भूक शमते, औषध दान केल्याने रोग बरे होतात आणि ज्ञानदान केल्याने अज्ञानाचा नाश होतो.

अभय दान या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे; कारण ते तिन्ही कार्ये पूर्ण करते. जैन तत्त्वज्ञानात, अभय दान हे सर्वश्रेष्ठ असे म्हटले गेले आहे. अभयदान म्हणजे आपल्याकडून कोणत्याही प्राण्याला त्रास न देणे, त्यांना निर्भय बनवणे, सर्वांचे संरक्षण करणे, त्यांचे संरक्षण करणे, त्यांना भीतीपासून मुक्त करणे. निर्भयतेशिवाय तिन्ही दान व्यर्थ आहेत. जिवाचे रक्षण झाले, तरच इतर प्रकारचे दान शक्य होईल, असे जैन तत्त्वज्ञानात सांगितलेले आहे.

  • जैन धर्मातील महत्त्वाचे चार दान

आहार दान : अन्न, पाणी, फळे, औषधे आदी गरजूंना देणे.

भिक्षा दान : भिक्षूंना मनापासून भिक्षा देणे.

ज्ञान-दान : शिक्षण, ज्ञान आणि माहिती इतरांना देणे.

अभय दान: प्राण्यांना आणि अन्य जिवांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT