Makar Sankranti 2024 esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या पूर्वेला ठेवा ही वस्तू, आर्थिक अडचणी होतील छुमंतर

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हा उपाय करा

Pooja Karande-Kadam

Makar Sankranti 2024 :

नव्या वर्षांचे स्वागत झाले की एकामोगमाग सणांची मालिकाच सुरू होते. वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला महत्त्वाचे स्थान आहे.  मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाईल. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. म्हणून याला मकर संक्रांत असे म्हणतात.

हा सण विशेषतः सूर्यदेवांच्या पूजेसाठी साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही वास्तु टिप्सचा वापर केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. (Makar Sankranti 2024)

शास्त्रानुसार असे सांगितले जाते की जेव्हा सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले तेव्हा त्यांनी काळे तीळ सोबत घेतले. यामुळे ते समाधानी झाले. त्यामुळे या दिवशी काळ्या तिळाच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिले गेले आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी घरात काही वस्तू आणल्याने लक्ष्मीची कृपा होते. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी या वस्तू घेऊन या.

वास्तुशास्त्रात मकर संक्रांतीच्या दिवशी घरात पितळेचा सूर्य आणावा असे सांगितले आहे. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. या दिवशी घराच्या पूर्व दिशेला पितळेचा सूर्य ठेवल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. घरामध्ये सूर्याची अशी प्रतिमा लावा ज्याच्या तळाला एक छोटी घंटा असते. असे केल्याने घरात सुख शांती येते, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

मकर संक्रांतीच्या दिवशी अशी पूजा करा

मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर या काळात पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व काम पूर्ण होते. या दिवशी तांब्याच्या भांड्यात लाल फुले व अक्षता मिसळून सूर्यदेवाला अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. (Makar Sankranti Vastu Tips)

तसेच सूर्यदेवाच्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. इतकेच नाही तर या दिवशी तीळ, ब्लॅंकेट,चादर आणि अन्नदान करणे विशेष मानले जाते. त्याचबरोबर करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना खिचडी खाऊ घालणे फायदेशीर ठरते.

ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेले कार्य व्यक्तीला शुभ फल प्रदान करते. या दिवशी माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशीही एक मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT