Makar Sankranti Recipe esakal
लाइफस्टाइल

Makar Sankranti Recipe : मकर संक्रांतीसाठी तिळाची खीर कशी बनवायची?

तुम्हाला संक्रांती दिवशी इंस्टंट काही बनवायचे असेल तर तुम्ही तिळाची खीर बनवू शकता

Pooja Karande-Kadam

Makar Sankranti Recipe :

नवीन वर्ष येताच सणांचा सिझन सुरू झाला आहे. मकर संक्रांतीचा सण १५ जानेवारीला साजरा होणार आहे. या दिवशी तीळ आणि गूळ दान करणे, त्यापासून बनलेले पदार्थ खाणे शुभ मानले जाते. काही घरात तर पंधरा दिवस आधीपासूनच अशा पदार्थांचा खमंग वास दरवळत असतो.

या सणाच्या काही महिने आधीपासून तिळाचे लाडू, तिळाची बर्फी बाजारात विकण्यासाठी येऊ लागते. मकर संक्रांतीच्या स्पेशल प्रसंगी, तुम्ही तिळापासून बनवलेल्या रेसिपी अनेक पदार्थ घरी बनवू शकता.

तुम्हाला संक्रांती दिवशी इंस्टंट काही बनवायचे असेल तर तुम्ही तिळाची खीर बनवू शकता. जी बनवायला सोप्पी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

खिरीची रेसिपी जाणून घेण्याआधी तीळ खाण्याचे फायदे काय आहे ते पाहुयात.

तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही.

दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्लेत, तर तुमचे दातही मजबूत होतील. तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीही वाढते.

त्वचा मुलायम राहण्यासाठीही तिळ उपयुक्त असतात. तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते.

 तिळाची खीर

साहित्य

1 कप पांढरे तीळ, 4-5 कप दूध, 1 कप साखर, चिरलेले बदाम आणि काजू, एक टीस्पून वेलची पावडर

कृती

  • सर्वप्रथम पांढरे तीळ घ्या आणि ते स्वच्छ करा.

  • यानंतर कढईत तीळ घालून थोडा वेळ फ्राय करून घ्या.

  • आता दुस-या भांड्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

  • भाजलेले तीळ बारीक वाटून घ्या.

  • आता ते दुधात मिसळा, 5-7 मिनिटे शिजू द्या.

  • खीरमध्ये तुमच्या आवडीनूसार ड्रायफ्रुट्स घाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT