लाइफस्टाइल

Bhogi 2024 : संक्रांतीला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी का खावी? जाणून घ्या शास्त्रीय कारण

भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी?

Aishwarya Musale

मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ म्हणून साजरा करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आनंद घेत जेवतात.

सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेल्या भोगीच्या भाजीसाठी हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. यात फोडणीला तीळ असतातच.

भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. त्या दिवसाचे महत्व म्हणून भोगीच्या भाजीचा विशेष मान असतो. पण आरोग्याच्या (Health) दृष्टीने आहारात या भाज्यांचे महत्व मोठे आहे. थंडीच्या दिवसात यामुळे चांगली उष्णता मिळते. काय आहे भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्त्व जाणून घेऊया.

भोगीच्या भाजीचे आरोग्यासाठी महत्त्व

  1. भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभरा या भाज्यांचा समावेश होतो आणि शेंगदाणेही घातले जातात.

  2. वांगं हे वातूळ असल्याने याचा वापर अनेकदा करू नका असे सांगण्यात येते मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत वा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते

  3. शेंगदाणे आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. याशिवाय याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते

  4. या भाजीसह दूध, दही, तूप, लोणी, ताक असे दुग्धजन्य पदार्थही खावेत जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील

  5. शरीराला उब मिळण्यासाठी भोगीची भाजी करण्यात येते. तसंच या भाज्या खाऊन तुमची तब्बेत अधिक चांगली राखण्यास मदत मिळते

भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरीच का खावी?

  1. बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते.

  2. शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे.

  3. यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पिठ भिजवावे आणि त्याची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते.

  4. दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गलतीसे मिस्टेक! उपसरपंच बाईंनी स्वत:विरोधात दिलं मत, निकाल लागल्यावर समजलं; तहसीलदारांसमोर घातला गोंधळ

"त्याने पॅन्टमध्ये हात टाकला आणि.." मराठी अभिनेत्रीने उघड केला तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार !

Marathi Ekikaran Samiti Protests : दादरच्या कबुतरखान्याविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक...पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Viral Video : धक्कादायक ! महिलेने बेकरीतून आवडीने खरेदी केला करी पफ, उघडताच निघाला साप, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Updates Live: नागपूरमध्ये मनपाच्या धावत्या बसमध्ये शॉटसर्किटमुळे आग, प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT