facewash sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips: चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो, स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तूंनी बनवा फेस वॉश

आपला चेहरा सुंदर आणि स्वच्छ दिसावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, यासाठी अनेकदा फेसवॉशचा वापर केला जातो.

Aishwarya Musale

आपला चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, यासाठी आपण अनेकदा फेसवॉशचा वापर केला जातो. बहुतेक ब्युटी प्रॉडक्ट्स बनवणारे फेस वॉश नैसर्गिक असल्याचा दावा देखील करतात, पण अशी खूप कमी उत्पादने आहेत ज्यात रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही.

चेहऱ्याला जर हे रसायन बराच वेळ स्पर्श करत असेल तर आपलं नुकसान होणारच आहे. हे हळूहळू आपल्या त्वचेची चमक कमी करू शकते. हे नये म्हणून आपण घरी तयार केलेल्या फेस वॉशचा वापर करणे खूप महत्वाचे आहे.

स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तूंनी बनवा फेस वॉश

सर्वांच्या घरात मूग डाळ तर असतेच, परंतु याचा वापर चेहऱ्याचे सौंदर्य निर्माण करण्यासाठी केला जातो. त्यासाठी सर्वात पहिले डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी घाला.

मग ते तयार झाल्यावर चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.

भजी तयार करण्यासाठी बेसनचा वापर केला जातो, परंतु त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील बेसनचा वापर केला जातो. घरी बेसनची पावडर नसल्यास तुम्ही चणाडाळ मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करू शकता.

तुमची त्वचा कोरडी असेल तर ते तिळाच्या तेलात मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ओलावा येईल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तिळाच्या तेलाऐवजी त्यामध्ये पाणी मिसळा.

ओट्सला हेल्दी फूड म्हणून ओळखले जाते, मात्र ओट्सने त्वचाही सुंदर बनवता येते. सर्वात पहिले, एक कप ओट्स घ्या आणि त्याला बारीक करा. नंतर त्यामध्ये त्यात गुलाबजल घाला.

हे तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवून टाका. असे केल्याने त्वचा चमकदार तर होईलच, पण पिंपल्स, मुरुम आणि इतर समस्या देखील दूर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा दुधगाव-खोची बंधारा खुला

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT