Makeup Tips google
लाइफस्टाइल

Makeup Tips : प्रवासाला जाताना मेकअप कीटमध्ये या गोष्टी ठेवायला विसरू नका

केस खराब होण्यापासून टाळायचे असेल तर तुमच्या आवडत्या शँम्पू आणि कंडिशनरच्या मिनी बाटल्या सोबत ठेवा.

नमिता धुरी

मुंबई : प्रत्येकासाठी प्रवास हा कितीही रोमांचक असला तरी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी मात्र हा प्रवास अनेकदा विपरीत परिणाम करणारा ठरतो. कारण प्रवासादरम्यान आपले दैनंदिन स्किन केअर रुटीन पाळता येणे शक्य नसते. बदलणारे वातावरणही त्वचेवर परिणाम करू शकते.

तुम्हाला तुमचा संपुर्ण ब्युटी किट घेऊन जाण्याचा जरी मोह होत असला तरी ते सर्व घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे प्रवासात योग्य सौंदर्य उत्पादने कशी निवडाल याविषयी या लेखाच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या डर्मेटो-सर्जन डॉ. रिंकी कपूर. (make sure your makeup kit has these things while going on travel )

• अल्कोहोल फ्री क्लिंझरचा वापर करणे. अगदी घाईत असताना कमीत कमी वेळेत योग्य प्रकारे मेकअप काढून टाकतात.

सनस्क्रीन : तुम्ही थंड ठिकाणी जात असाल किंवा समुद्रकिनाऱ्यावर फिरणार असाल तर सनस्क्रीन आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य संरक्षण होते.

• मॉइश्चरायझर : त्वचेला नियमित पोषण मिळणे आवश्यक आहे आणि हे काम मॉइश्चरायझर करते. मॉइश्चरायझर तुमची त्वचा कोरडे होण्यापासून रोखेल. तेलकट त्वचेसाठी वॅाटर बेस मॉइश्चरायझर निवडा आणि कोरड्या त्वचेसाठी ॲाईल बेस मॉइश्चरायझर निवडणे योग्य राहील.

• मेकअप रीमूव्हर वाइप्स : ते डिस्पोजेबल असतात आणि जास्त जागा देखील व्यापत नाहीत. रात्रीच्या वेळेस यांचा वापर करणे सोयीस्कर ठरते.

• बॉडी लोशन : केवळ तुमचा चेहराच नाही, प्रवासादरम्यान तुमचे शरीरही डिहायड्रेट होऊ शकते, त्याकरिता तुम्हाला तुमच्या ब्युटी किटमध्ये चांगल्या प्रतीच्या बॉडी लोशनची गरज आहे.

• ड्राय शॅम्पू : प्रवासादरम्यान नेहमीच केस धुणे शक्य नसते त्यासाठी ड्राय शैम्पू हा एक चांगला पर्याय ठरतो. यामुळे केसांना घामामुळे येणारा वास नाहिसा होईल.

• फेस क्लीन्झर : सकाळ आणि रात्रीच्या नित्यक्रमांमध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे त्वचेवरील धूळ, मेकअप काढून टाकते आणि त्वचेवरील छिद्र स्वच्छ करते. सौम्य आणि हायड्रेटिंग अशा क्लीन्झरची निवड योग्य राहील.

• बीबी क्रीम : प्रवासाचा अर्थ असा नाही की तुम्हाला पूर्णवेळ मेकअपशिवाय राहावं लागेल. बीबी क्रीम ही प्राइमर, मॉइश्चरायझर, फाउंडेशन, कन्सीलर म्हणून वापरली जाऊ शकते आणि त्यात काही सन शील्ड गुणधर्म देखील आहेत. ही मल्टीफंक्शनल ट्यूब तुमच्या किटमध्ये ठेवायला विसरू नका.

• लिपस्टिक : यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, ते ओठांना पोषण देतात आणि ओठांना एक रंगही देतात. तुम्ही एका सेटसोबत मिनिएचर लिपस्टिक देखील मिक्स आणि मॅच करू शकता.

• लिप बाम : हे ओठांना तडे जाण्यापासून रोखतात. ते तुमच्या किटमध्ये ठेवायला विसरु नका.

• कॉम्पॅक्ट पावडर : फाउंडेशन लावणे हे वेळखाऊ काम आहे. कॉम्पॅक्ट पावडर हा त्याला दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे. ते सांडत नाही आणि योग्य फिनीशींग देते. तुम्ही फक्त पावडर चेहऱ्यावर लावली तरी एक फ्रेश लूक मिळवू शकता.

• परफ्यूम : चांगला सुंगध प्रत्येकालाच आकर्षित करतो. त्यामुळे तुमच्यासोबत परफ्यूम ठेवायला विसरु नका. खासकरून जर तुमच्या प्रवासात खूप चालणे, शारीरिक क्रिया इत्यादींचा समावेश असेल तर तुम्ही प्रवासात लहान आकाराच्या परफ्यूमच्या बाटल्या तुमच्यासोबत ठेवा.

• कन्सीलर स्टिक : जर तुमचा प्रवास थकवणारा असेल तर तुमच्या प्रवासाच्या गरजांसाठी हायड्रेटिंग, मॅट फिनिश कन्सीलर सोबत बाळगा. ही काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचा लपवण्यास आणि त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत करू शकते.

• शँम्पू आणि कंडिशनर : केस खराब होण्यापासून टाळायचे असेल तर तुमच्या आवडत्या शँम्पू आणि कंडिशनरच्या मिनी बाटल्या सोबत ठेवा.

• काजळ / मस्करा : तुम्ही या दोघांवर प्रयोग करू शकता आणि तुमच्या डोळ्यांना तुम्हाला हवा तसा लूक देऊ शकता. ते रेखीव डोळ्यांकरिता किंवा डोळे मोठे दिसण्यासाठी वापरता येतात.

तुम्‍ही त्वचेच्‍या तीव्र आजाराने त्रस्‍त असल्‍यास त्वचारोग तज्ज्ञांनी शिफारस केलेली त्वचा उत्‍पादने देखील सोबत न्यायला विसरू नका. जर तुम्हाला ब्रेकआउट्स किंवा त्वचा आणि केसांच्या इतर समस्यांबद्दल काळजी वाटते तर वर दिलेल्या यादीतील वस्तू न्यायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ghaywal Mulshi Pattern : कुख्यात गुंड सचिन घायवळने 'मुळशी पॅटर्न'मध्ये केलंय काम, प्रवीण तरडेंचं काय होतं स्पष्टीकरण?

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या बूथ यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना

Lakshami Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन महाराष्ट्रात, भारतात अन् जगभरात नक्की कोणत्या तारखेला करायचं? वाचा एका क्लिकवर

Nagpur Municipal Election 2025: निवडणुकीसाठी आयोगाची यादी धरणार ग्राह्य; ३१ जुलै २०२५ पर्यंतची राहणार मतदार यादी

Mhada Lottery: ५ वर्षांत ३५ लाख घरे, मुंबईत मिळणार परवडणारी घरे; एकनाथ शिंदे यांची घोषणा

SCROLL FOR NEXT