Beauty Tips esakal
लाइफस्टाइल

पहिल्यांदाच Makeup करताय! या गोष्टींची घ्या काळजी

चेहऱ्यावर मेकअप चांगला सेट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेला समजून घेणं.

सकाळ वृत्तसेवा

चेहऱ्यावर मेकअप चांगला सेट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेला समजून घेणं.

चेहऱ्यावर मेकअप (Makeup) चांगला सेट होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेला समजून घेणं. जर तुम्ही पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर अशावेळी काही गोष्टी समजत नाहीत, त्यामुळे योग्य पद्धतीने मेकअप करण्यासाठी इन्फ्लुएन्सर कॉपी करण्याची चूक करू नका. कारण त्याला कदाचित तुम्हाला हवा तसा लूक मिळणार नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिगिनर्स मेकअप गाईड शेअर करणार आहोत, जे तुम्हाला खूप उपयोगी पडेल.

क्लिनिंग अॅंड मॉइश्चरायजिंग:

मेकअप लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे ही पहिली स्टेप आहे. यासाठी चांगला फेस वॉश वापरा आणि त्यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर (Moisturizer) करा. यानंतर पहिला आपल्या बोटांनी चेहऱ्यावर प्राइमर लावा आणि हाताने प्रेस करा आणि चांगले मिसळा. प्राइमरमधून त्वचा इवल टोन दिसून येते. त्याचबरोबर फिनिशिंगही चांगलं होतं, चेहऱ्यावर पॅचेस दिसत नाहीत.

फाउंडेशन अप्लाय करा:

तु्मच्या त्वचेच्या मॅच होईल असा फाउंडेशन (Foundation) निवडा. फाऊंडेशनलाही प्राइमरप्रमाणेच अप्लाय करा. म्हणजे बोटांनी डॉट्स बनवा आणि नंतर स्पंजच्या मदतीने त्यांना चांगले मिसळा. फाऊंडेशन लावल्यानंतर चेहऱ्यावर ग्लोसह स्मूथ फिनिश मिळते.

आय मेकअप:

लूक कॅज्युअल ठेवण्यासाठी फक्त मस्कारा लावा. ड्रामेटिक लूकसाठी विंग आय लायनर लावा. सुरुवातीला विंग लायनर बसवणं इतकं सोपं नसतं, त्यासाठी तुम्ही एटीएम कार्ड, टेपसारख्या गोष्टींचा वापर करता.

ब्लश आणि लिपस्टिक:

जास्त बोल्ड लिपकलर्स वापरणे टाळा. सॉफ्ट पिंक, प्लम किंवा न्यूड रंगाची लिपस्टिक बेस्ट असेल. चीक बोन्सवर ब्लशचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT