Makeup Tips esakal
लाइफस्टाइल

Makeup Tips : आहे त्या वयापेक्षा दिसाल जास्त तरुण, त्यासाठी फक्त हा मेकअप रूटीन फॉलो करा

मेकअप आर्टिस्टच्या या काही गोष्टी तुमच्या कामी येतील. चला तर आज आपण मेकअप हॅक्सबाबत जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Makeup Tips : महिलांना मेकअपची विशेष आवड असते. तुम्ही आहात त्यापेक्षा कमी वयाचे वाटता असे म्हणत कोणी कौतुक केले की महिलांना फार बरं वाटतं. काहीजण तरूण दिसण्यासाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. मात्र अधिक पैसे खर्च न करतासुद्धा तुम्ही आहात त्यापेक्षा कमी वयाचे दिसू शकता. यासाठी मेकअप आर्टिस्टच्या या काही गोष्टी तुमच्या कामी येतील. चला तर आज आपण मेकअप हॅक्सबाबत जाणून घेऊया.

हायड्रेशन महत्वाचे

एक्सपर्ट मेकअप आर्टिस्टच्या मते, अँटी-एजिंग मेकअपसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते स्किन हायड्रेट ठेवणे. त्वचेला सॉफ्ट आणि हायड्रेट ठेवण्यासाठी हायलूरॉनिक अॅसिडयुक्त सीरमने सुरुवात करा. त्यानंतर तुमचे आवडते मॉश्चरायझर लावा.

या पद्धतीने फाउंडेशन लावू नका

ज्यात जास्त कव्हरेज असेल किंवा अधिक मॅटीफाइंग असेल असे फाउंडेशन अजिबात लावू नका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या फाइन लाइन्स वाढू शकतात. त्वचेला चमकदार बनवण्यासाठी टिंटेड मॉश्चरायझर किंवा हलकं फाउंडेशन निवडा.

लिक्विड प्रोडक्ट लावा

एक्सपर्ट लिक्विड प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला देतात. छोट्या ब्रशने लिक्वीड कंसीलर लावा. डोळ्यांना सुंदर बनवण्यासाठी डोळ्यांच्या आतील भागालासुद्धा तुम्ही कंसीलर लावू शकता. पीच रंगाचा कंसीलर तुम्ही निवडू शकता. मात्र त्याचा अधिक वापर करू नका.

ब्लशर आणि हायलायटरसाठी क्रीम आणि लिक्विड प्रोडक्ट निवडा.

क्रीम हायलायटर

क्रीम हायलायटर वापरणे अजिबात विसरू नका. ते स्किनला ग्लोइंग बनवते. चीकबोन्स किंवा भुवयांच्या वरील बाजूस हायलायटर आवर्जून लावा.

डार्क आयब्रो

आयब्रो टवटवीत दिसावेत यासाठी त्यावर गडद रंगाच्या आयब्रो पेन्सिलचा वापर करा. तुम्ही ब्रो जेलचासुद्धा वापर करू शकता. डोळ्यांना हेवी लुक देण्यासाठी डार्क रंगाचा ब्राउन आयशॅडो लावा.

आयब्रो कर्ल करा

आयब्रो कर्ल केल्यास तुम्ही आहात त्यापेक्षा कमी वयाचे दिसाल. मात्र असे करण्यापासून वाचा.

लिप कलर

उन्हाळ्यात पिच कलर तर हिवाळ्यात बेरी कलर निवडा.

सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव करा

तुम्ही उन्हात जाता तेव्हा स्किन सेल्स डॅमेज होण्याचा धोका वाढतो. तेव्हा उन्हाच्या तीव्र किरणांपासून त्वचेचा बचाव करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Today: दिवाळीपूर्वी चांदीने 2 लाखांचा टप्पा ओलांडला; एकाच दिवसात 10,000 रुपयांची वाढ

Maratha Reservation : 'कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी नोकरभरती करू नका'; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Mumbai : ठाकरे बंधूंसह मविआचे नेते पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेणार, पण शरद पवार अनुपस्थित

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' दिवशी येऊ शकतो

High Court: राज्य सरकारला दणका, 'तो' निर्णय हायकोर्टानं केला रद्द

SCROLL FOR NEXT