Tension 
लाइफस्टाइल

या ५ गोष्टी अंमलात आणा..आणि भूतकाळातून बाहेर पडा

भूतकाळात घडलेल्या गोष्टी सतत आठवत असतील तर त्या गोष्टी तुमच्या मनातून आधी काढून टाकण्याचा प्रयत्न करा.

भूषण श्रीखंडे

या पाच गोष्टी आमंलात आणल्या तर तुम्ही भूतकाळातून बाहेर पडण्यास नक्की तुमची मदत होईल.

जळगावः आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात ज्यात अनेक कठीण प्रसंग येतात आणि या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी अनेकांना कठीण परिस्थीतून (Tension) जाव लागते. त्यामुळे अनेकांची मानसीक स्थिती (Mental state) खूप बदलते..त्यात निराशा, स्वतःला अपराधीपणाची जाणीव सतत येणे, पश्चात्ताप येणे अशा समस्या येतात. अशा परिस्थीतीतून बाहेर पडणे आवश्यक असते असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तुम्ही या पाच गोष्टी अंमलात आणल्या तर तुम्ही भूतकाळातून (Past events) बाहेर पडण्यास नक्की तुमची मदत होईल. चला तर जाणून घेवू कोणत्या या महत्वाच्या टिप्स..

Tension

नविन विचार मनात आणा

भूतकाळात घडलेल्या गोष्टी सतत आठवत असतील तर त्या गोष्टी तुमच्या मनातून आधी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करत बसला तर तुमचे आयुष्य नकारात्मकतेकडे जाऊ शकते. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार न करता जीवनात पुढे जाणे आणि नवीन मार्गाचा विचार करावा.

Tension

काही मित्रांपासून दुर रहा

असे बरेच मित्र अनेकांच्या आयुष्यात असतात जे आपल्यासाठी काहीच करत नाहीत आणि तुमचा आत्मविश्वास खाली आणत असतात. अशा मित्रांपासून दुर अंतर ठेवणे चांगले असून मागच्या घटना वांरवार सांगून ते भूतकाळातून बाहेर पडू देत नाहीत. म्हणून, अशा परिस्थितीत, या मित्रांपासून दूर राहावे.

Tension

मन मोकळे करा

प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याच्या भूतकाळात वाईट घडलेल्या अनेक गोष्टी असतात. त्या गोष्टी त्याच्या मनात सतत चालू असतात. त्यामुळे कायम मानसीक अस्वस्थता जाणवत असेल तर तुमचा जवळचा व एखादा खास मित्र जो आपल्याला समजून घेवू शकले व योग्य मार्ग सांगेल अशा मित्रा अथवा व्यक्ती सोबत तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी सांगून मन मोकळे करू शकतात. त्यामुळे तुमचे मन हलके होवून तुम्हाला या गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडेल.

Tension

स्वताःला दोष देवू नका

भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांमध्ये तुम्ही स्वताःला दोषी ठरवू नका. सत्याला सामोरे जावून त्या गोष्टी स्विकारून पुढे कसे जावे याचा विचार करावा. अशा परिस्थितीत जितक्या लवकर तुम्ही ती गोष्ट किंवा घटना स्वीकारता, तितक्या लवकर तुम्ही आयुष्यात पुढे जाल.

Tension

क्षमा करा

जर तुम्हाचा सोबत काही वाईट घडले असेल, तुमची फसवणूक झाली असेल तर वाईट वाटू न देता तेच विचार मनात न आणता समोरच्याला क्षमा करा. क्षमा करणे याचा अर्थ असा नाही की आपण त्यांच्या कृतीला समर्थन देत आहात, परंतु आपण या गोष्टींद्वारे स्वत:ला पुढे जाण्यासाठी मन तुमचे कणखर बनवीणे व आत्मविश्वास तुमचा वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : 2014ला अदानी महाराष्ट्रात एका ठिकाणी होते, आता...; राज ठाकरेंनी नकाशाच दाखवला

Bigg Boss Marathi 6 Live Update: रितेश देशमुखच्या सहकलाकार अभिनेत्रीची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT