लाइफस्टाइल

Married life Tips : वैवाहिक जिवनाला कंटाळलाय? या टीप्सने नात्यात येईल धमाल

नातं कोणतेही असो ते ताजे-तवाने ठेवायला हवे

सकाळ वृत्तसेवा

पूणे : नातं कोणतेही असो ते ताजे-तवाने ठेवायला हवे. नात्यात असलेला गोडवा साखरेच्या पाकासारखा दिर्घकाळ टिकणारा हवा. पण 'आजकाल ‘कंटाळा आलाय या नात्याचा’ असे नविन लग्न झालेली जोडपी आणि लग्नाला २० वर्ष झालेली जोडपीही म्हणत आहेत. लग्न नवे असेल तर एकमेकांना जाणून घेण्यात वेळ जातो. पण नक्की जोडीदाराचा स्वभाव कसा आहे हे माहिती नसल्याने वाद होतात.

लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांची सवय होऊनही एकमेकांचे वागणे खटकते. सततच्या वाद आणि भांडणामुळे मग नात्याचा कंटाळा येतो. जोडीदार नकोसा वाटायला लागतो. त्यामुळे मग घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा गोष्टींचा सामना करावा लागू नये म्हणून नात्याला एक सेकंड चान्स देऊन काही बदल स्वत: मध्ये करण्याची गरज आहे. यासाठी काय उपाय करावे हे पाहुयात.

रोमँटिक व्हा

एखादे खेळणे जसे पून्हा सुरू होण्यासाठी त्याची चावी फिरवावी लागते. अगदी तसेच, नाते रिफ्रेश होण्यासाठी वैवाहिक जीवनातील कंटाळा घालवण्यासाठी स्वत:ची चावी फिरवा. म्हणजे तूमच्या स्वभावात बदल करा. जोडीदारासोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा. स्वभाव रोमँटिक बनवा आणि जोडीदाराला डेटवर घेऊन जा. डेटवर जाऊन तूमच्या भुतकाळातील सुखद क्षणांना उजाळा द्या.

चुकांकडे दुर्लक्ष करा

नात्यात पून्हा पून्हा त्याच चूका आणि त्यावरील वादाने नाते नकोसे वाटते. त्यामुळे जोडीदाराने केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करा. एकमेकांच्या छोट्या-छोट्या चुकांवरून मूड खराब करू नका. उलट त्यांना समजावून त्या चूका सुधारण्यासाठी मदत करा. काही चूक असेल तर जोडीदाराला प्रेमाने समजावून सांगा.

सरप्राईज तर पाहिजेच

कधीकधी एकमेकांना सरप्राईज द्या. यामुळे जीवनात उत्साह टिकून राहतो. लांबचा प्रवासही एकमार्गे केला तर कंटाळवाणा होतो. त्यामुळे वैवाहीक जीवनात जोडीदाराला सरप्राईज देत रहा.

Keywords

relation tips, married life, married life tips, relationship tips, marriage problem, lifestyle, lifestyle news,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : अस्वलांच्या भयानक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT