meet jay brewer the man who living with snakes 
लाइफस्टाइल

Video : अमेरिकेतील अवलियाचं सर्पप्रेम; तयार केलं चक्क सापांचं संग्रहालय

शर्वरी जोशी

माणूस आणि प्राणी यांचं नातं पूर्वापार चालत आलं आहे. त्यामुळे आजही माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्री आपल्याला पाहायला मिळते. काही व्यक्तींची प्राण्यांसोबत केवळ मैत्रीच नसते तर ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात.आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे ते त्यांची काळजी घेतात. अनेक जण घरात कुत्रा, मांजर, पोपट किंवा अन्य प्राणी पाळतात. परंतु, असेही काही व्यक्ती आहेत जे केवळ कुत्रा किंवा मांजर नाही तर साप, अजगर असे अजस्त्र प्राणी पाळतात. खरंतर या प्राण्यांकडे पाहिल्यावर कितीही भीती वाटत असली तरीदेखील अनेक जण त्यांचा मनापासून आणि आनंदाने सांभाळ करतात. अमेरिकेत असाच एक अवलिया असून तो चक्क सापांचं संग्रहालय चालवतो. होय, हे वाचून अनेकांना धक्का बसले. पण, जे ब्रीवर नामक एक व्यक्ती सापांचं संग्रहालय चालवत असून त्याच्याकडे असंख्य विविध जातीचे साप असल्याचं पाहायला मिळतं.

सध्या सोशल मीडियावर जे ब्रीवर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्याकडे असलेले खतरनाक साप दाखवतांना दिसत आहे. तसंच सापांसोबत कसं वागलं पाहिजे हेदेखील ते सांगत आहेत. या व्हिडीओमध्ये ते एक साप दाखवत असताना अचानकपणे हा साप त्यांच्यावर झडप घालतांनादेखील दिसून येत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

जे ब्रीवर 'द रॅपटाइल' नावाचं संग्रहालय चालवत असून हे संग्रहालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. या संग्रहालयामध्ये अनेक दुर्मिळ सापांच्या प्रजाती आहे. विशेष म्हणजे या सापांवर जे यांचं प्रचंड प्रेम असून ते सापांना अंगाखांद्यावर खेळवतांनादेखील दिसतात.

दरम्यान, जे ब्रीवर यांचं इन्स्टाग्रामवर एक पेज असून यावर त्यांचे जवळपास २२ लाख फॉलोअर्स आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : कोल्हापूरच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपची पकड, ४ उमेदवार विजयी

BMC Election Result : मुंबई कुणाची? मतमोजणीला सुरुवात, पहिले कल आले समोर

Kolhapur Municipal Election Results : कोल्हापुरात टपाली मतदानाचा कौल कुणाला? सतेज पाटलांकडून कडवी झूंज, पहिल्या टप्प्यात कोण आघाडीवर

Latur Municipal Election Results : लातूर महानगरपालिका निवडणुकीचे पहिले कल हाती, भाजपची मुसंडी, कॉंग्रेसला मोठा धक्का

इचलकरंजी महापालिकेत भाजप विरुद्ध शिव-शाहू आघाडीची थेट लढत

SCROLL FOR NEXT