Mens Health Tips esakal
लाइफस्टाइल

Mens Health Tips : फिट्ट अंडरवेअर वापरणं जीवावर बेतू शकतं, अशी करा योग्य अंडरवेअरची निवड

अंडरवेअर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Pooja Karande-Kadam

Mens Health Tips :

आपल्याकडे खरेदीची एक पद्धत लोकांनी सेट केली आहे. खरेदीला गेलात की सगळे ड्रेस ट्राय करून बघितले जातात. जेव्हा अंडरवेअर्स खरेदी केले जातात तेव्हा ते ट्राय केले जात नाहीत. यामूळे घरी येऊन वापरल्यानंतर त्या फिट्ट असल्या तरी लोक तसेच वापरतात.

अंडरवेअर किंवा कोणत्याही प्रकारचे इनरवेअर खरेदी करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचे फॅब्रिक आणि त्याच्या फिटिंगकडे लक्ष दिले पाहिजे. फिट्ट अंडरवेअर घातल्याने अनेक प्रकारे शरीराचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात डॉ. शोभा गुप्ता, वैद्यकीय संचालक, स्त्रीरोग आणि IVF विशेषज्ञ यांनी काही गोष्टींची माहिती दिली आहे.

त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते

जर तुम्ही खूप फिट्ट अंडरवेअर घातलात तर ते तुमच्या कंबरेतच नाही तर पेल्विक एरियाच्या आसपासच्या भागातही खाज होऊ शकते. सतत खाजवल्याने तिथली त्वचा सोलली जाते. त्यामुळे तुम्हाला दाह, जळजळ होऊ शकतो. या जळजळीवर योग्यवेळी उपाय केले नाही.तर, तिथे इन्फेक्शन पसरू शकते.

शरीरातील रक्ताभिसरण थांबू शकते

फिट्ट अंडरवेअरचा रक्ताभिसरणावर थेट परिणाम होऊ शकतो. तुम्ही फिट्ट अंडरवेअर घातल्यास, ते मांडीच्या भागात रक्त पुरवठा कमी प्रमाणात प्रतिबंधित करू शकते. रक्त परिसंचरण स्वतःच थांबल्याने अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, पाय सुन्न होऊ शकतात आणि मुंग्या येणे देखील जाणवू शकते. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास तुम्हाला चालणेही कठीण होऊ शकते.

शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो

फिट्ट अंडरवेअर घालणे ट्रेंड म्हणून चांगले असले. तरी तज्ज्ञांच्या मते, फिट्ट अंडरवेअर घातल्याने अनेक भागांमध्ये रक्ताभिसरण थांबते. यात मांड्या, लिंग आणि अंडकोष यांचा समावेश होतो. पुरुषाचे जननेंद्रिय आणि अंडकोषांच्या दिशेने रक्ताभिसरण थांबल्याने झाल्यामुळे, इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. शुक्राणूंची गुणवत्ता इतर अनेक कारणांमुळे प्रभावित होऊ शकते.

ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो

तुम्हाला आश्चर्य वाटेल की फिट्ट अंडरवियरचा ऍसिड रिफ्लक्सशी काय संबंध आहे? खरी गोष्ट अशी आहे की फिट्ट अंडरवेअर घातल्याने पोटावर दबाव निर्माण होतो. यामुळे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ देखील होऊ शकते.

बॅक्टेरिया वाढू लागतात

फिट्ट अंडरवेअर घातल्यामुळे  प्रजनन अवयवांमध्ये हवा नीट पोहोचू शकत नाही. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला हवेची गरज असते. त्याचबरोबर महिलांच्या प्रजनन अवयवांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. योग्य वायुवीजन उपलब्ध नसल्यास, घाम येऊ शकतो, ज्यामुळे खराब जीवाणूंची वाढ होऊ शकते.

विशेषत: व्यायाम करणाऱ्यांना ही समस्या उद्भवू शकते. ही परिस्थिती योग्य नाही. घाम अंडरवेअरमध्ये शोषला जाईल असे कापड निवडावे.

अंडरवेअर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

कधीही खूप फिट्ट अंडरवेअर घालू नका

अंडरवेअर खरेदी करताना, त्याचे फॅब्रिक लक्षात ठेवा.

खरेदी करण्यापूर्वी अंडरवेअरचे फिटिंग तपासण्यास विसरू नका

अंडरवेअरचे कापड त्वचेला सूट होईल असे असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: ठाणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ 25–30 मिनिटांत होणार! 13.9 किमी फ्रीवेचा कामाला MMRDA कडून सुरुवात, मार्ग कसा आहे?

Sarfaraz Khan : सर्फराजचे ट्वेंटी-२०त शतक! मुंबई २०० पार... गौतम गंभीर अन् अजित आगरकर यांना 'गार' करणारी अफलातून खेळी

Maharashtra Police Bharti 2025 Update: भावी पोलिसांसाठी मोठी संधी; उमेदवारी अर्ज भरण्याबाबत झाला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उमरगा शहरात शंभरी पार केलेल्या आजीने केले मतदान

कलाचा निरोप अद्वैतपर्यंत पोहोचणार... 'लक्ष्मीच्या पावलांनी'मध्ये शेवटी काय घडणार? 'या' दिवशी प्रदर्शित होणार अंतिम भाग

SCROLL FOR NEXT