लाइफस्टाइल

मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नये? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं

सकाळ डिजिटल टीम

मासिक पाळीमध्ये 70 ते 80 टक्के महिलांना खूप त्रास होतो. कोणाचे खूप पोट दुखते तर कोणाचे कमी. काही महिलांना तर इतका त्रास होतो की त्या बेशुध्द होतात. मासिक पाळीमध्ये त्रास होणे ही चांगली लक्षण नाही असे मानतात पण यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्हाला मासिक पाळी संबधीत गैरसमज देखील आहेत ते आम्ही दूर करणार आहोत.

मासिक पाळीमध्ये आंबट किंवा गोड पदार्थ खाऊ नये ?

मासिक पाळीमध्ये आंबट पदार्थ खाऊ नये यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. आंबट खाद्यपदार्थांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे इम्युनिटी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. मासिक पाळीच्या काळात थंड पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजेत कारण या काळात गॅसच्या समस्या होत असतात. थंड पदार्थ खाताना थोडे संयम ठेवला पाहिजे.

मासिक पाळी दरम्यान गर्भवती राहता येत नाही?

मासिक पाळी दरम्यान गर्भवती राहणे अशक्य नाही. जेव्हा तुमची मासिक पाळी नियमित असतात तेव्हा गर्भवती राहण्याची शक्यता आणखी वाढते. मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गर्भवती राहू शकता. तसेच जर मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव जास्त होतो तेव्हा गर्भधारणेची शक्यता जास्त असते.

मासिक पाळीच्या काळात व्यायम करावा का?

मासिक पाळीच्या काळात व्यायाम केल्याने त्रास वाढू शकतो असे मानले जाते पण व्यायाम केल्याने त्रास कमी होतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोपे व्यायाम, योगासन निवडू शकता.

मासिक पाळी दरम्यान शरीर संबध ठेवू नये?

मासिक पाळी दरम्यान शरीर संबध ठेवावे की नाही हा पुर्णपणे तुमचा निर्णय आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मासिक पाळीदरम्यान शरीर संबध ठेवण्यामध्ये कोणतीही अडचण नाही पण योग्य काळजी घेणे गरजेची आहे हे लक्षात ठेवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT