Mental Health  esakal
लाइफस्टाइल

Mental Health : एखाद्याची प्रगती पाहून आपण का जळतो? मानसशास्त्रानुसार जाणून घ्या ही भावना कशी कमी करायची?

काही लोक तर या गोष्टीचा विचार करून नैराश्येत जातात

सकाळ डिजिटल टीम

Mental Health :

ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना प्रमोशन मिळालं तर आपण त्यांच्या तोंडावर आपण गोड बोलतो. पण कुठेतरी मनात त्या व्यक्ती विरोधात जेलसीची भावना आपल्या मनात रेंगाळते. अनेक लोकांसोबत हे घडते आणि ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

जसा व्यक्तीला आनंद होतो, जसा त्याला राग येतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा मत्सर, हेवा वाटणे, प्रगतीवर जळणे ही सामान्य भावना आहे. ही भावना नक्की का मनात येते. आणि ती मनातून कायमची डिलिट कशी करायची याबद्दल माहिती घेऊयात.

अनेक लोक या भावनेवर नियंत्रण ठेवतात आणि पुढे जातात. परंतु काही लोकांसाठी ही ईर्षा त्यांच्या मनातून जात नाही. ही भावना तुम्हाला शांत बसू देत नाही. तुम्ही मनातल्या मनात सतत त्या गोष्टीचा विचार करत राहता.

त्यामुळे, चिडचिड होते, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. काही लोक तर या गोष्टीचा विचार करून नैराश्येत जातात. केवळ मानसिक नाहीतर शारीरिकही व्याधी आपल्याला जडतात. एखाद्याला कमी लेखण्याची, मनातील जळमट कसे दूर करावे याबद्दल जाणून घेऊयात.

ऑफिसमध्ये किंवा अगदी शाळा-कॉलेजमध्येही आपल्या जोडीदाराच्या प्रगतीवर जळणे ही मानसिक प्रवृत्ती आहे. अशा लोकांना नेहमी त्यांच्या समवयस्कांपेक्षा स्वत: चांगले करण्याची इच्छा असते.  

अनेकदा लोकांना असे वाटते की समोरच्या व्यक्तीमध्ये माझ्यापेक्षा कमी गुण आहेत तरीही त्याचे सिलेक्शन झाले, मी केलेली मेहनत वाया गेली. हळूहळू ही प्रवृत्ती इतकी वाढते की व्यक्ती निराश होऊ लागतो. या चिडचिडीच्या भावनेचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

या भावनेतून दूर व्हायचे यासाठी या गोष्टी करा

स्वतःवर विश्वास ठेवा

जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तेव्हा मत्सराची भावना निर्माण होते. या परिस्थितीत, स्वतःवर प्रेम करा. आपल्या स्वतःच्या प्रगतीबद्दल विचार करा आणि आपण ते केल्यास काय होईल. स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःवर समाधानी रहा. आत्म-प्रेम तुमच्यातील मत्सराची भावना कमी करेल.

तुमची क्षमता ओळखा

जेव्हा तुम्हाला तुमची क्षमता कळत नाही तेव्हा मत्सर वाढतो. म्हणून, आपली क्षमता ओळखा. तुम्हीही सर्व काही करू शकता असा विचार करा. पण ते सकारात्मक दिशेने असावे आणि कोणाचेही नुकसान होऊ नये. इतरांच्या आयुष्यात डोकावू नका. फक्त तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा.

ध्येय निश्चित करा

प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येये असली पाहिजेत. जर तुम्ही एखादे ध्येय निश्चित केले तर ते तुम्हाला त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. यासाठी अधिक चांगली रणनीती बनवा.  यामध्ये जुन्या चुका सुधारा आणि तुमच्या मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

तुमची ग्रोथ होतेय की नाही हे तपासा

तुमची वाढ पाहण्याचा एक मार्ग म्हणजे आम्ही आतापर्यंत जे काही मिळवले आहे ते आमच्या क्षमतेनुसार नाही. यापेक्षा चांगली कामगिरी करायची आहे. तथापि, अपेक्षित परिणाम न आल्यास निराश होऊ नका. मनात सकारात्मकता असेल तर वाढ निश्चित होईल. हार मानू नका, प्रयत्न करत रहा. काही अपेक्षित परिणाम न आल्यास त्याबद्दल रडत नाही तर परिस्थितीला सामोरे जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT