Milk Storing Tips esakal
लाइफस्टाइल

Milk Storing Tips : फ्रिजमध्ये न ठेवताही दूध 24 तास फ्रेश राहील, त्यासाठी वापरा ही सोपी ट्रिक

या काही ट्रिकने तुमचे दूध दीर्घकाळ फ्रेश राहील. चला तर ही सोपी ट्रिक जाणून घेऊया

साक्षी राऊत

Milk Storing Tips : उन्हाळ्याच्या दिवसात अनेक खाद्यपदार्थ खराब होतात. घरचे दूधही दीर्घकाळ उन्हाळ्यात टिकत नाही. दूध खराब होऊ नये म्हणून लोक दूध गरम करून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र असे करूनही कधी कधी दूध फाटते. किंवा एखाद्यावेळी लाइट गेली तरीसुद्धा फ्रिजमध्ये असलेले दूध फाटते. मग अशा वेळी या काही ट्रिक कामी पडतात, ज्याने तुमचे दूध दीर्घकाळ फ्रेश राहील. चला तर ही सोपी ट्रिक जाणून घेऊया.

या ट्रिकने दूध दीर्घकाळ फ्रेश राहील

कधी कधी आपल्याला वाटतं की आपण फ्रेश भांड्यात दूध गरम करतोय मात्र चुकून त्यात काहीतरी धूळ किंवा सूक्ष्म पदार्थ असतात. भांड स्वच्छ दिसत असलं तरी दूध त्यात ओतण्याआधी एकदा भांडं परत धुवून घ्या. भांड्यात दूध ओतण्याआधी त्यात १ किंवा २ चमचे पाणी टाका. यामुळे दूध बुडाला चिकटणार नाही आणि क्रीम चांगल्याप्रकारे जमेल.

दूधाला दिवसातून ४ वेळा गरम करा

उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून ते २४ तासांत चार वेळा उकळवा. आणि उकळताना गॅसची मंद आचेवर ठेवा. दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा. दूध कोमट झाल्यावर प्लेटने हलके झाकून ठेवावे. काहीवेळा दूध पूर्णपणे झाकलेले असतानाही त्याचा स्फोट होतो. अशा परिस्थितीत दुधाची बाटली पूर्णपणे झाकणे टाळा.

दूधात बेकिंग सोडा घाला

आपण अनेकदा दूध उकळायला विसरतो, त्यामुळे दूध फाटण्याचा धोका वाढतो. अशा वेळी बेकिंग सोडा टाकणे बेस्ट ठरेल.

यासाठी जेव्हा तुम्ही दूध गॅसवर उकळण्यासाठी ठेवता तेव्हा त्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाका आणि चमच्याच्या मदतीने मिक्स करा. त्यामुळे उकळल्यावर दूध फाटणार नाही. हे लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात बेकिंग सोडा टाकल्यानेही दूध फाटू शकते.

पॅकेटचे दूध असे स्टोअर करा

तज्ञांच्या मते, पॉकेटमध्ये असलेले दूध जास्त काळ उकळण्याची गरज नाही, कारण ते आधीच जंतूमुक्त आणि संरक्षित राहण्यासाठी पाश्चराइज केलेले आहे. म्हणूनच पुन्हा गरम केल्यावर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT