Monsoon Health Tips esakal
लाइफस्टाइल

Monsoon Health Tips : पावसाळ्यात या भाज्यांपासून दूर राहीलेलंच फायद्याचं ठरेल!

पावसाळ्यात आहारासंबंधीच्या या गोष्टी लक्षात ठेवा

Pooja Karande-Kadam

Monsoon Health Tips : पाऊस एका बाजूने हवाहवासा वाटतो, तर दुसऱ्या बाजूने पावसाळ्यामुळे होणारी गैरसोय नकोशी वाटते. त्यातून पावसाळ्यातील आजारपण तर अगदीच नकोनकोसे करणारे असते. मात्र, आयुर्वेदातील ‘वर्षा ऋतुचर्या’ नीट समजावून घेतली व प्रत्यक्षात आणली, तर या काळातही आरोग्य उत्तम ठेवता येते व पावसाचा आनंद घेता येतो.

थंड हवा, वादळ-वारा, हवेत वाढलेली आर्द्रता, ढगांमुळे अडवला गेलेला सूर्यप्रकाश या सर्वांचा सामना पावसाळ्यात करावा लागतो. सर्दी, ताप, खोकला, साथीचे रोग, दम्याचा त्रास, अंगदुखी, कंबरदुखी, दूषित हवा-पाणी-अन्नामुळे निरनिराळ्या प्रकारचे जंतुसंसर्ग होऊ शकतात.

पावसाळा सुरु झाला की बाजारामध्ये अनेक रानभाज्या आणि पालेभाज्या दिसू लागतात. या दिवसांमध्ये भाज्या ताज्या मिळत असल्यामुळे प्रत्येक गृहिणीचा कल पालेभाज्या खरेदी करण्यावर असतो. त्यातही मेथी, पालक, करडई, शेपू या भाज्या आवर्जुन घेतल्या जातात.

मात्र, या दिवसांमध्ये पालेभाज्या शरीरासाठी जितक्या फायदेशीर आहेत. तशाच काही भाज्या या आरोग्यासाठी घातकही आहेत. अनेक भाज्या खाल्ल्यामुळे इंफेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पावसाळ्यात कोणत्या पालेभाज्या खातांना खबरदारी घ्यावी हे पाहुयात.

पावसाळ्यात मेथी, पालक आदी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यात लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात. शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी पालक अत्यंत गरजेचा आहे. तसंच पालकामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते असं म्हटलं जातं. परंतु, या काळात पालकावर अनेक सूक्ष्म अळ्या किंवा किडे असण्याची शक्यता असते.

कोबी

कोबीचे सेवन पावसाळ्यात करू नये. कारण यामुळे पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते. अनेकदा कोबी वरुन चांगला दिसतो. मात्र, त्याच्या आतमध्ये कीड लपलेली असते. त्यामुळे जर कोबीची पानं वरुन कुरतडल्यासारखी वाटत असतील तर तो कोबी घेऊ नका.

मशरूम

पावसाळ्यात मशरूम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो आणि तुम्हाला पोटदुखीची ही तक्रार होऊ शकते.

वांगी

पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांगीमध्ये किडे असू शकतात जे पोटात जाऊ शकतात. एकदा ही कीड वांग्याला लागली की संपूर्ण वांग खराब होतं. अनेक जण किडलेला भाग काढून इतर चांगला भाग वापरतात. मात्र, चुकूनही तो भाग घेऊ नका. कारण, ही सूक्ष्म कीड वांग्याच्या संपूर्ण भागात पसरले असतात.

शिमला मिर्ची

सिमला मिरची स्वादिष्ट आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली भाजी आहे. मात्र पावसाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यात ग्लुकोसिनोलेट्स नावाची रसायने असतात. जे चावताना किंवा चघळताना आयसोथियोसायनेटमध्ये मोडतात. या रसायनांमुळे मळमळ, उलट्या, जुलाब आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो जेव्हा ते कच्चे किंवा शिजवलेले खातात.

पावसाळ्यात आहारासंबंधीच्या या गोष्टी लक्षात ठेवा

- पावसाळ्यात आहारपदार्थ हलके असण्याकडे लक्ष द्यायचे असतेच, तसेच आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणेही आवश्‍यक असते. भुकेपेक्षा जास्ती प्रमाणावर खाल्लेले अन्न हलके असले, तरी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः रात्रीचे जेवण अगदी कमी किंवा द्रवस्वरूपात घेणे अधिक श्रेयस्कर असते.

- पावसाळ्यात आले, सुंठ यांचा शक्‍य तेथे वापर करणे चांगले असते. उदा. आमटी, कढी किंवा सूप बनविताना मिरचीऐवजी आले टाकता येते. ताकात किसलेले आले टाकता येते. चहामध्ये किसलेले आले, गवती चहा टाकल्यास चवही उत्तम लागते व आरोग्याच्या दृष्टीनेही हितकर असते.

- पावसाळ्यात कुळथाचे सूप वा कुळथाचे पिठलं खाणेही चांगले असते, कारण कुळीथ उष्ण असतात, पण पचायला हलके असतात. बाजरी उष्ण असल्याने बाजरीची किंवा ज्वारी-बाजरीचा मिश्र भाकरी पावसाळ्यात योग्य असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT