Chaturmas 2023 : चातुर्मासात धर्म अन आरोग्यशास्त्राची ‘युती’; आहारात पालेभाज्या खाण्याचे टाळा अन याचा करा समावेश

Chaturmas 2023
Chaturmas 2023esakal

Chaturmas 2023 : चातुर्मासात उपवासाला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व असल्याने मनाच्या शुद्धीकरणासाठी धर्मशास्त्र हे आरोग्यशास्त्राच्या हातात हात घालून कार्य करते. या काळात नागरिकांनी पालेभाज्या टाळून सात्त्विक आहार घ्यायला हवा.

भूक कमी झाल्यामुळे पालेभाज्या न खाता डाळी, राजगिरा लाडू, गूळ यांसह कडधान्याचा सात्त्विक आहार घेतला पाहिजे. चार महिने सात्त्विक आहार घेतला तर पुढील आठ महिन्यांत आरोग्य सुदृढ राहते. (chaturmas special what to eat and what not nashik news)

उपवास याचा अर्थ देवाच्या सानिध्यात जाण्याचा कालावधी वाढवणे. त्यासाठी चातुर्मास हा सर्वोत्कृष्ट काळ समजला जातो. आहारातील सात्त्विकपणा जपत मनाचे शुद्धीकरण केले जाते. श्रावण महिन्यात उपवास केले जातात. वातावरणात चार महिने दलदल राहत असल्याने मनातील दलदल नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी, करडई, शेपू यासारख्या पालेभाज्या खात नाहीत.

कांदा, तेलकट पदार्थही वर्ज्य असतात. कांदा हा शुक्र उत्तेजक असून तामसी प्रवृत्तीचा मानला जातो. त्यामुळे या काळात अशा पदार्थांचे सेवन टाळावे. सात्त्विक आहारात मुग, मसूर डाळ, राजगिरा लाडू, चिक्की, गूळ व कडधान्याचा वापर वाढवा. पांढरे वाटाणे, चवळी, भाताचे पदार्थही आहारात घेतल्यास उपयुक्त ठरतात.

तर फलाहारचा उपवास करणे अधिक आरोग्यदायी समजले जाते. उपवास आणि शाबुदाण्याचा काहीच संबंध नाही. परंतु, त्याचा सर्रास वापर होतो. शाबुदाण्यात शेंगदाण्याऐवजी खोबरे टाकावे. त्याची खीर किंवा खिचडी अधिक चविष्ट लागते. चातुर्मास हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे महिने समजले जात असल्याने धर्मशास्त्राला आरोग्यशास्त्राची जोड लाभते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chaturmas 2023
Chaturmas 2023 : चातुर्मासात भगवान विष्णू झोपल्यावर या देवी देवतांची करावी उपासना

हे पण लक्षात ठेवा

*चातुर्मासात गरम पाणी पिल्यास आरोग्य उत्तम राहते

* देवाची आराधना वाढावी यासाठी उपवास केले जातात

*फलाहार घेऊन उपवास केल्यास आरोग्यदायी समजला जातो

* मांसाहार करणे टाळावे

* आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढल्यास जुलाब होण्याची शक्यता

चातुर्मास म्हणजे काय?

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार आषाढी एकादशीपासून ते कार्तिक शुध्द एकादशीपर्यंत चार महिन्यांचा काळ हा चातुर्मास म्हणून पवित्र मानला जातो. या संपूर्ण काळात पाऊस पडत असल्याने सर्वत्र दलदल असते आणि शरीरावरही त्याचा परिणाम होतो.

Chaturmas 2023
Tomato Health Risk: तुम्ही टोमॅटो खाण्याचे शौकीन आहात का? आताच व्हा सावध, नाहीतर...

शरीरातील दलदल कमी करण्यासाठी चातुर्मासाच्या या कालवधीत मनाची शुद्धी करण्यासाठी धर्मशास्त्राने आरोग्य शास्त्राच्या माध्यमातून सात्त्विक आहाराचा मूलमंत्र दिला आहे. थोडक्यात, देवाच्या सानिध्यात जाण्यासाठी या चार महिन्यांतील उपवास उपयुक्त ठरतात.

"पावसाळा सुरू झाला की थंडी पडेपर्यंत चातुर्मास समजला जातो. या काळात भूक कमी होते. उपवास केल्यास देवाच्या सानिध्यात जाण्याचा हा काळ असल्याने आरोग्य शास्त्राने धर्मशास्त्राच्या हातात हात घालून मनाची शुद्धी करण्याचा हा कालावधी. या चार महिन्यांत आहार सात्त्विक ठेवल्यास पुढील आठ महिने तब्बेत अगदी व्यवस्थित राहते. त्यामुळे चार महिने सात्त्विक आहार घ्यावा." - वैद्य विक्रांत जाधव,

Chaturmas 2023
Chaturmas 2023 : मंडळी, चातुर्मासाची आधुनिक कहाणी माहितीये? जाणून घ्या आजच्या काळातलं महत्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com