monsoon rainy season  
लाइफस्टाइल

Monsoon Tips: पूरजन्य परिस्थितीत काय करावे? गोंधळून न जाता या गोष्टी फॉलो करा

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची चांगलीच बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा जारी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची चांगलीच बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागाने आज अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा जारी केला आहे. तर काही शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागतो. तर आज आपण जाणून घेऊया पुराचा धोका टाळण्याची कोणती खबरदारी घ्यावी. (monsoon rainy season Maharashtra What to do in flood situation follow tips )

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणं महत्त्वाचं आहे. पूरस्थिती पाहता अनेक भागात त्या त्या परिसरातील जिल्हाधिकारी अनेक आदेश देतात. त्याचं काटेकोर पालन करा. गरज असेल तरच घराबाहेर पडा.

सुरक्षित स्थळी स्थलांतर करा

तुम्ही पुराच्या अधीन असलेल्या क्षेत्रात असाल तर सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. उंच भागावर जा. निर्वासन आदेशांचे पालन करा आणि चेतावणी चिन्हांचे पालन करा. पूर येण्यापूर्वी प्रशासनाने नागरिकांच्या स्थलांतरासाठी काही जागा नेमलेल्या असतात. त्यामुळं तुम्ही तुमचे स्थलांतर त्या जागी करु शकता.

तसेच, पूर आल्यावर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास घरातील वस्तू पलंगावर आणि टेबलावर ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा.

तसेच, सुरक्षित स्थळी स्थलांतर होताना आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊ जा. खोल पाण्यात प्रवेश करु नका. पाण्याची खोली तपासण्यासाठी काठीचा वापर करा. जेव्हा प्रशासन घरी जाण्याची परवानगी देईल तेव्हाच तुमच्या घरी परत जा.

पाळीव प्राण्यांची सोय करा

पुराचा थेट परिणाम मानव आणि प्राण्यांना सर्वाधिक जाणवतो. अचानक पूर येणे किंवा प्रचंड पूर आल्याने लोकांचे आणि प्राण्यांचे अनेक नुकसान होते ज्यात जीवित आणि मालमत्तेची हानी होते. त्यामुळं आपल्यासोबत पाळीव प्राण्यांचीदेखील काळजी घ्या.

पुराच्या अधीन असलेल्या क्षेत्रात असाल तर प्राण्यांची उंच ठिकाणी सोय करा. तसेच त्यांना पुरामुळं कोणताही आरोग्याचा धोका उद्भवणार नाही याचीही दक्षता घ्या. चुकूनही पाळीव प्राणी , इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.

पूर पहायला जाऊ नका

पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका. प्रशासनाच्या सूचनेचे योग्य प्रकारे पाल नका. पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पुर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.

पूर परिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करण टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Dombivli Crime: पगार थकवला, तरूणाला राग अनावर, मालकाकडे गेला अन्...; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Vadala Inscription:'शिलालेखात यादवांचा राजा सिंहदेवाचा उल्लेख'; वडाळा येथे सापडलेल्या शिलालेखाच्या वाचनानंतर झाले सिद्ध

Latest Marathi News Live Update: लासलगाव रेल्वे स्थानकावर निकृष्ट दर्जाच्या कांद्याची लोडिंग कारवाई? खासदार भगरे यांचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT