skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: पावसाळ्यात सुंदर चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी नक्की फॉलो करा या टिप्स

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Aishwarya Musale

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. आर्द्रतेमुळे त्वचा चिकट होते. अशा स्थितीत मुरुमांची समस्या वाढू शकते.

पण आता तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी पावसाळ्यात स्किन केअर रूटीन घेऊन आलो आहोत. ज्याला फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवू शकता.

मॉनसून स्किन केयर टिप्स

1. पावसाळ्यात वातावरणात भरपूर आर्द्रता असते. अशा स्थितीत त्वचा सतत चिकट राहते.अशा परिस्थितीत धूळ आणि घाण चिकटण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच वेळोवेळी त्वचा स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. सकाळी सर्वप्रथम त्वचा स्वच्छ करा. फेस वॉश वापरण्यासोबतच चांगल्या क्लिंझरनेही चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वीही चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून झोपणे चांगले मानले जाते.

2. काही लोकांना असे वाटते की पावसाळ्यात सनस्क्रीन लावण्याची काय गरज आहे. पण तो उन्हाळा असो की पावसाळा किंवा हिवाळा. प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. सनस्क्रीन एक प्रकारे प्रोटेक्टिव लेयरसारखे काम करते. पावसाळ्यात चेहऱ्याला संसर्ग आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

३. पावसाळ्यात दर एक किंवा दोन दिवसांनी तुमचा चेहरा एक्सफोलिएट करावा. जेव्हा तुम्ही एक्सफोलिएट करता तेव्हा चेहऱ्यावर जमा झालेले बॅक्टेरिया आणि विषाणू काढून टाकले जातात. यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. तुम्ही एकतर बाजारातून स्क्रब विकत घेऊ शकता किंवा नैसर्गिक घटकांचा वापर करून घरी स्क्रब बनवू शकता. तुम्ही लिंबू, मध आणि साखरेचा स्क्रब लावू शकता.

4. पावसाळ्यात तुम्ही मॉइश्चरायझर जरूर वापरा. तुम्ही हल्का लाइटवेट नॉन ग्रेसी मॉइश्चरायझर लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT