पावसाळ्यात त्वचेची काळजी Esakal
लाइफस्टाइल

टॉवेलमुळे पसरू शकतं गजकर्ण? पावसाळ्यात Skin Infection टाळण्यासाठी ही घ्या काळजी?

पावसाळ्याच्या Monsoon दिवसांमध्ये गजकर्ण रोखण्यासाठी वेळीच उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर घरातील इतर सदस्यांना देखील या स्किन इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो

Kirti Wadkar

पावसाळ्याचा काळ हा जरी अल्हाददायक आणि रिफ्रेश करणारा असला तरी या काळामध्ये अनेक आजारांसोबत त्वचेच्या समस्यांचा Skin Problems धोका मात्र जास्त असतो. पावसाळ्याच्या काळामध्ये बॅक्टेरियल इंफेक्शनचा धोका जास्त असतो. Monsoon Skin Care Tips Marathi Keep your Towel clean to avoid infection

या काळात सतत ओले कपडे घातल्याने किंवा दमटपणामुळे देखील गजकर्णासारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होवू शकतात. गजकर्ण हे एका प्रकारचं फंगल इंफेक्शन Skin Infection आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास ते शरीरावरील इतर भागांवरही अधिक वाढू शकतं. इतकचं नव्हे तर घरातील इतर सदस्यांना देखील त्याची लागण होवू शकते.

म्हणूनच पावसाळ्याच्या Monsoon दिवसांमध्ये गजकर्ण रोखण्यासाठी वेळीच उपाय करणं गरजेचं आहे, नाहीतर घरातील इतर सदस्यांना देखील या स्किन इंफेक्शनचा सामना करावा लागू शकतो.

वारंवार होवू शकतं गजकर्ण

गजकर्णापासून सुटका मिळवण्यासाठी खास काळजी घेण गरजेचं आहे. कारण हे अशा प्रकारचं फंगल इंफेक्शन आहे. जे बरं झाल्यानंतरही वारंवार होवू शकतं. पावसाळ्यात वातावरणात दमटपणा असल्याने हे फंगल इंफेक्शन होतं. पाय, हाथ, मान, कंबरेचा घेर किंवा प्रायव्हेट पार्टच्या आसपास गजकर्ण होतं. योग्य काळजी न घेतल्यास ते अधिक वाढू शकतं.

टॉवेलमुळे पसरू शकतं गजकर्ण

अनेकजण आंघोळीनंतर ओला टॉवेल कुठेही टाकतात किंवा खोलीतच एखाद्या ठिकाणी पसरवून ठेवतात. मात्र हाच ओला टॉवेल तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांमा गजकर्ण होण्यासाठी जबाबदार ठरू शकतो. एवढचं नव्हे तर या मुळे त्वचेच्या इतरही समस्या निर्माण होवू शकतात.

दमट वातावरणामुळे ओल्या टॉवेलवर बॅक्टेरिया जलद गतीने निर्माण होण्याची आणि वाढण्याची शक्यता असते. हा टॉवेल पुन्हा वापरल्यास गजकर्ण होवू शकतं. तसचं जर एखाद्या व्य़क्तीला गजकर्ण झालं असेल आणि त्यात व्यक्तीचा टॉवेल कुटुंबातील इतर व्यक्तीने वापरल्यास त्यांनाही गजकर्ण होण्याचा धोका असतो.

हे देखिल वाचा-

गजकर्णापासून बचाव करण्यासाठी घ्या काळजी

आंघोळीनंतर ओला टॉवेल लगेचच उन्हात किंवा मोकळ्या हवेत किंवा पंख्याखाली वाळवत ठेवा.

टॉवेल किमान दर २ दिवसांनी धुवा. तसचं तुम्हाला एखादी स्किन अॅलर्जी झाली असल्यास दररोज टॉवेल धुणं गरजेचं आहे.

घराबाहेरून आल्यावर हात-पाय धुतल्यानंतर किंवा तोंड धुतल्यानंतर ते पुसण्यासाठी एखादा वेगळा नॅपकिन ठेवा.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्किन इंफेक्शनचा धोका टाळण्यासाठी कॉटनचे सैल कपडे घाला.

गजकर्ण झालेल्या व्यक्तीचा टॉवेल, रुमाल, कंगवा तसचं कपडे घरातील इतर व्यक्तींनी वापरू नये.

गजकर्ण झालेल्या ठिकाणी वारंवार स्पर्श करू नका किंवा खाजवू नका.

स्वच्छता बाळगा.

डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा काही घरगुती उपाय करून गजकर्णाची समस्या नियंत्रणात आणू शकता. मात्र त्याचसोबत योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT