Laura Hampson
 and Darlene
Laura Hampson and Darlene esakal
लाइफस्टाइल

आईची कार्बन कॉपी! मायलेकींचे एकाच ड्रेसमधील फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

प्रत्येक आईचा हा प्रयत्न असतो की तिने आपल्या मुलांना सुंदर कपडे घालून तयार करावे.

प्रत्येक आईचा हा प्रयत्न असतो की तिने आपल्या मुलांना सुंदर कपडे घालून तयार करावे. युनायटेड किंगडममधील विगन येथे राहणाऱ्या लॉरा हॅम्पसन या आईची एक वेगळीच आवड आहे. ती तिच्या दीड वर्षाच्या मुलीला तिच्या सारखेच कपडे घालायला लावते, जेणेकरून दोघीही एकसारखेच दिसावेत.

फॅशनेबल कपड्यांचे शौकीन लॉरा हॅम्पसन (वय- 39) तिची मुलगी डार्लीनला तिच्यासारखेच कपडे घालते. त्यांच्या रोजच्या कपड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन आणि कपड्यांची स्टाइल सेमच आहे. डार्लिन 19 महिन्यांची आहे आणि तिने जन्मापासूनच तिच्या आईने सिलेक्ट केलेले मॅचिंग आउटफिट वापरत आहे. व्यवसायाने व्हिज्युअल मर्चेंडाइजर, लॉरा म्हणते की तिच्या फॅशन सेन्समुळेच तिला मॅचिंग आउटफिट्स घालण्याची प्रेरणा मिळते.

Laura Hampson and Darlene

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, आई आणि मुलीकडे 150 सेम एकसारखे आउटफिट्स आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. लॉरा तिच्या मुलीसोबत आठवड्यातील दोन दिवस सुट्टीच्या दिवशी मॅचिंग कपडे घालते. तिच्या कपड्यांमध्ये अधिक बोल्ड प्रिंट्स असतात, जे लॉराला स्वतःला खूप आवडतात.

आई आणि मुलीच्या वॉर्डरोबमध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यासाठी वेगवेगळे कपडे आहेत. ती सांगते की तिने क्वचितच तिच्या मुलीला पारंपरिक लहान मुलांचे कपडे घातले आहेत आणि ती लॉरा स्वतः जे ड्रेसिंग करते त्याचे प्रिंट्स आणि रंगांचे कपडे घालते. या कपड्यांमध्ये पोल्का डॉट्स, ब्राइट कलर्स, अॅनिमल प्रिंट्स आणि बोल्ड प्रिंट्स आहेत. लॉरा म्हणते की तिला स्वतःसाठी आणि तिच्या मुलीसाठी चॅरिटी शॉपमधून शॉपिंग करायला आवडते. येथे तिला विविध प्रकारच्या स्टाइलच्या ड्रेसेस मिळतात. कलर मॅच करण्यासाठीही ती अनेकवेळा कपडे कलरिंग करायला मागेपुढे पाहत नाही.

आई-मुलीच्या स्टाइलिंगचे चाहतेही काही कमी नाहीत. ती @yer_ma_does_twinning या नावाने Instagram वर तिचे अकाउंट आहे. लॉरा आणि तिच्या मुलीचे अतिशय क्यूट मॅचिंग आउटफिट्स येथे दिसतील. नेहमीच्या दिवसातही अनेकजण तिला पाहण्यासाठी थांबतात. लॉरा सांगते की, जेव्हा तिला कळले की ती एका मुलीची आई होणार आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिला वाटले की ती पुन्हा लहान होणार आहे.

मात्र, त्यांच्या ट्विनिंग ट्रेंड ची सुरवात नुकतीच सुरू झाली. एकदा तिची मुलगी आणि तिचे कपडे मॅच झालेले तिला आवडले. यानंतर, लॉराने तिच्या मुलीसाठी असेच कपडे खरेदी केले आणि तिला ते खूप आवडतात. लॉरा म्हणते की जोपर्यंत तिची मुलगी स्वतः नकार देऊ शकत नाही, तोपर्यंत ती मॅचिंग ड्रेसेस घालणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: कन्हैय्या कुमार यांचा धर्मांतर करा असे सांगणारा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल, वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT